मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kalyan Crime : मोबाइल चोराला पकडण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवाशाची उडी; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू

kalyan Crime : मोबाइल चोराला पकडण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवाशाची उडी; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 28, 2024 11:36 AM IST

kalyan Crime : कल्याण येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून पडल्याने पुण्यातील एका तरुण बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. मोबाइल चोराला पकडणासाठी धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल चोराला पकडण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवाशाने उडी मारल्याने मृत्यू
मोबाइल चोराला पकडण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवाशाने उडी मारल्याने मृत्यू

kalyan Crime : कल्याण येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून पडल्याने पुण्यातील एका तरुण बँक कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नसल्याने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेतून प्रवास करत असतांना फटका गँगच्या एका मोबाइल चोराने मृत व्यक्तीच्या हाताला मारून त्यांचा मोबाइल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या चोरला पकडण्यासाठी धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने गंभीर जखमी होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मोबाइल चोराला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

प्रभास भांगे (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर आकाश जाधव असे आरोपी चोराचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभास भांगे हे पुण्यातील रहिवासी असून ते एका बँकेत रोखपाल म्हणून काम करत होते. भांगे हे दोन दिवसांपूर्वी होळी निमित्त मुंबईत मित्रांना भेटायला गेले होते. दरम्यान, सिद्धेश्वर एक्सप्रेसने परत येत असतांना त्यांचा रेल्वेतून पडून जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी कोणताही साक्षीदार नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

Malaad suicide news : मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळं अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, मंगळवारी रेल्वे पोलिसांनी मोबाइल चोरटा असणाऱ्या आकाश जाधव याला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक केली. आकाश जाधव यांच्या जवळ भांगे यांचा फोन सापडल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. यावेळी चोरानेच धावत्या रेल्वेतून भांगे यांच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याला पकडण्यासाठी भांगे यांनी रेल्वेतून उडी मारल्याचे देखील त्याने सांगितले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

प्रभास भांगे हे होळी साजरी करून सोमवारी सिद्धेश्वर एक्सप्रेसने परत जात होते. यावेळी डब्याच्या दारात उभ्या असलेल्या भांगे यांच्या हातावर मारून जाधव याने त्यांचा फोन चोरून नेला. त्याला पडण्याचा प्रयत्न करत असतांना ते खाली पडल्याने भांगे यांचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी जाधव विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (हत्येसाठी दोषी नसून हत्या) आणि कलम ३८२ (मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर केलेली चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sion ROB Closure Postponed: सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम तिसऱ्यांदा पुढं ढकललं!

प्रभास भांगे हे या पूर्वी मुंबईत राहत होते परंतु दोन वर्षांपूर्वी ते पुण्यात बदली होऊन आलेआले होते. ते एका खाजगी बँकेत कॅशियर म्हणून काम करत होते. भांगे हे आपल्या मुंबईतील मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी आले होते आणि सोमवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने पुण्याला परतत असतांना सिद्धेश्वर एक्स्प्रेस रेल्वेतून कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या आरोपी आकाश जाधवने भांगेचा मोबाईल हिसकावून गाडी पुढे जात असताना त्याच्या हातावर वार करून पळ काढला," असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.

सुरुवातीला जेव्हा भांगे यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला तेव्हा कोणीही या घटनेचे साक्षीदार नसल्याने अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मंगळवारी जीआरपीच्या पथकाने आंबिवली रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असलेल्या जाधवला ताब्यात घेतल्याने या घटनेचा उलगडा झाला.

IPL_Entry_Point