मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price : इस्रायल-इराण युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम, काय आहेत आजचा भाव?

Gold Silver price : इस्रायल-इराण युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम, काय आहेत आजचा भाव?

Apr 15, 2024, 04:32 PM IST

  • Gold Silver Price after Israel Iran Tension : इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धाची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाला आहे.

इस्रायल-इराण युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम, काय आहेत आजचा भाव?

Gold Silver Price after Israel Iran Tension : इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धाची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाला आहे.

  • Gold Silver Price after Israel Iran Tension : इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धाची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाला आहे.

Gold Silver Price Today : इस्रायल आणि इराण यांच्यात अचानक उद्भवलेल्या तणावाचा सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून नवनवे विक्रम करणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित घट झाली आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने ४४२ रुपयांनी स्वस्त झाले तर, चांदी किलोमागे ३१३ रुपयांनी स्वस्त झाली.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) नव्या दरानुसार, २४ कॅरेट सोने ७२,७३२ रुपयांवर उघडले आज चांदीचा भाव ८३,५०६ रुपयांवर उघडला. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी घसरून ७२४४१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४०३ रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅम ६६,६२३ रुपयांवर आला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भावही आज ३३२ रुपयांनी घसरून ५४५४९ रुपयांवर आला. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव २५९ रुपयांनी घसरून ४२५४८ रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या दरात ३ वर्षांत २७८१३ रुपयांची वाढ

१ एप्रिल २०२१ रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४४,९१९ रुपये इतकी होती. तीन वर्षांत सोनं तोळ्यामागे २७,८१३ रुपये महागलं आहे. तर, २०२१ ते २०२४ या तीन वर्षांत चांदी १८३०७ रुपयांनी वाढून ६३७३७ रुपये प्रति किलोवरून ८३५०६ रुपयांवर गेली आहे.

मार्च-एप्रिलमध्ये कसा होता सोन्याच्या किंमतीचा प्रवास

२८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६७२५२ रुपयांवर पोहोचला होता.

१ एप्रिल रोजी सोन्यानं तोळ्यामागे ६८९६४ रुपये असा विक्रम केला होता.

३ एप्रिल रोजी सोन्याचा भाव आणखी वाढून पुन्हा ६९५२६ च्या नवीन शिखरावर पोहोचला.

४ एप्रिल रोजी ६९,९३६ चा सर्वकालीन उच्चांक गाठला.

८ एप्रिल रोजी सोने ७१,२७९ रुपयांवर पोहोचले.

९ एप्रिल रोजी ७१,५०७ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.

१२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ७३१७४ रुपयांवर पोहोचला.

मुंबईत आजचा सोन्या-चांदीचा भाव किती?

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या तुलनेत ६०० रुपयांनी वाढून आज ७३१५० रुपयांवर पोहोचला आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५० रुपयांनी वाढून ६७,०५० रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ५४,८६० रुपये आहे. मुंबईत चांदीचा आजचा भाव किलोमागे ८६००० रुपये आहे.

 

विभाग

पुढील बातम्या