मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : सहकुटुंब प्रवास घडेल, आर्थिक स्थिती सुधारेल; आज या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

Lucky Zodiac Signs : सहकुटुंब प्रवास घडेल, आर्थिक स्थिती सुधारेल; आज या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

Apr 27, 2024, 10:41 AM IST

    • Lucky Rashi Bhavishya 27 april 2024 : आज, शनिवार, २७ एप्रिल हा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि धनू या राशींसाठी भाग्याचा असणार आहे.
Lucky Zodiac Signs : सहकुटुंब प्रवास घडेल, आर्थिक स्थिती सुधारेल; आज या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

Lucky Rashi Bhavishya 27 april 2024 : आज, शनिवार, २७ एप्रिल हा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि धनू या राशींसाठी भाग्याचा असणार आहे.

    • Lucky Rashi Bhavishya 27 april 2024 : आज, शनिवार, २७ एप्रिल हा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि धनू या राशींसाठी भाग्याचा असणार आहे.

आज, शनिवार, २७ एप्रिल संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. हा योग ५ राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. त्या ५ राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : धृती आणि शुल योगात सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 12, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : गुरु शुक्र युती, या ४ राशीच्या लोकांसाठी अडचणीचा काळ, आर्थिक नुकसान होईल

May 11, 2024 05:59 PM

Rashi Bhavishya Today : विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 11, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : अक्षय्य तृतीयेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 10, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: एक-दोन नव्हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ५ महायोग! ‘या’ राशींना मिळणार भरपूर फायदा

May 09, 2024 05:34 PM

Rashi Bhavishya Today : वैशाख मासारंभचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 09, 2024 04:00 AM

वृषभ: आज योग चांगले आहेत. तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.

मिथुन: आज चंद्रबल उत्तम असल्याने उत्तम नियोजना मुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल. कलाकाराना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कर्क: आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. 

सिंह: आज मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.

धनुः आज चंद्रभ्रमण पाहता आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.

विभाग

पुढील बातम्या