ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत तो 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहिला आणि कौतुक केले आहे.