मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma : रोहित शर्मानं काही काळ ब्रेक घ्यावा, गावस्करांनी सांगितलं सर्वांना पटणारं कारण

Rohit Sharma : रोहित शर्मानं काही काळ ब्रेक घ्यावा, गावस्करांनी सांगितलं सर्वांना पटणारं कारण

Apr 26, 2023, 08:35 PM IST

    • Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्माला आयपीएल २०२३ मध्ये फलंदाजीत फारसे यश मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये २५.८६ च्या सरासरीने आणि १३५.०७ च्या स्ट्राईक रेटने केवळ १८१ धावा केल्या आहेत.
sunil gavaskar rohit sharma

Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्माला आयपीएल २०२३ मध्ये फलंदाजीत फारसे यश मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये २५.८६ च्या सरासरीने आणि १३५.०७ च्या स्ट्राईक रेटने केवळ १८१ धावा केल्या आहेत.

    • Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्माला आयपीएल २०२३ मध्ये फलंदाजीत फारसे यश मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये २५.८६ च्या सरासरीने आणि १३५.०७ च्या स्ट्राईक रेटने केवळ १८१ धावा केल्या आहेत.

Sunil Gavaskar advised Rohit Sharma to take a break : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (sunil gavaskar rohit sharma) यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माची बॅट शांत आहे. तो धावा काढण्यासाठी सातत्याने धडपडत आहे. रोहितने या हंगामातील ७ सामन्यांमध्ये केवळ १८१ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सुनील गावसकर म्हणाले की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून काही सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर लक्ष केंद्रित करावे. रोहित मंगळवारी (२५ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध (MI VS GT) ८ चेंडूंत २ धावा काढून बाद झाला. या सामन्यानंतर गावस्कर एका स्पोर्ट्स चॅनलवर बोलत होते.

सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

रोहित शर्माला आयपीएल २०२३ मध्ये फलंदाजीत फारसे यश मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये २५.८६ च्या सरासरीने आणि १३५.०७ च्या स्ट्राईक रेटने केवळ १८१ धावा केल्या आहेत.

गावसकर पुढे म्हणाले की, “मला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल पहायचे आहेत. खरे सांगायचे तर, मी असेही म्हणेन की रोहितने काही काळ विश्रांती घ्यावी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे, तो थोडासा चिंतेत दिसत आहे. कदाचित तो WTC फायनलबद्दल विचार करत असेल, मला नक्की माहित नाही. WTC फायनलसाठी लयीत येण्यासाठी त्याने तीन किंवा चार सामन्यांचा ब्रेक घ्यावा".

पुढील बातम्या