मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ICC WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, कोणत्या खेळाडूंचा समावेश?

ICC WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, कोणत्या खेळाडूंचा समावेश?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 19, 2023 04:48 PM IST

ICC WTC Final 2023 : भारताविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात तब्बल १७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Australian Squad For ICC World Test Championship Final
Australian Squad For ICC World Test Championship Final (HT)

Australian Squad For ICC World Test Championship Final : आयपीएल संपल्यानंतर येत्या जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध होणाऱ्या फायनलसाठी एकूण १७ सदस्यीय संघाची घोषणा केली असून ऑस्ट्रेलियन संघाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे देण्यात आली आहे. चांगल्याच फॉर्मात असलेले फलंदाज आणि गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियन संघात भरणा करण्यात आला आहे. त्यामुळं आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ॲशेस मालिकेसाठीही ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी आणि ॲशेसच्या पहिल्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियात ओव्हल येथील ऐतिहासिक सात जूनपासून मैदानावर होणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात ॲशेस मालिकेला सुरुवात होणार आहे.

Cricket Fixing News : भारताच्या स्टार खेळाडूला फिक्सिंगची ऑफर; क्रिकेट जगतात मोठी खळबळ

ऑस्ट्रेलियन संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश?

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस आणि जोश हेझलवूड या खेळाडूंचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे.

WhatsApp channel