मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Oct 22, 2022, 12:37 PM IST

    • rohit sharma on pakistan tour: टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहितला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानेही विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. रोहितला भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. मात्र. यावर त्याने बोलण्यास नकार दिला.
Rohit Sharma press conference

rohit sharma on pakistan tour: टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहितला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानेही विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. रोहितला भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. मात्र. यावर त्याने बोलण्यास नकार दिला.

    • rohit sharma on pakistan tour: टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहितला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानेही विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. रोहितला भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. मात्र. यावर त्याने बोलण्यास नकार दिला.

rohit sharma on pakistan tour: टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. येथे भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया कप २०२३ साठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जय शाह हे बीसीसीआयचे सचिव तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आहेत. अशा स्थितीत त्यांच्या वक्तव्याने पाकिस्तान चांगलाच संतापला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

यानंतर पाकिस्तानाच्या माजी क्रिकेटपटूंसह त्यांच्या क्रिकेट बोर्डाने या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर भारतीय माजी खेळाडू जय शाह यांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना दिसले. दरम्यान, टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहितला याबाबतीत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने यावर बोलण्यास नकार दिला.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘भारत पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, या विषयावर सध्या बोलण्यात अर्थ नाही. बीसीसीआयला ते ठरवू द्या. मी येथे फक्त T20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे’.

यादरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्नही विचारला. पत्रकाराने विचारले की, ' यंदाच्या T20 विश्वचषकात आतापर्यंत बरेच चढ-उतार झाले आहेत, दोन वेळा विश्वविजेता वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडिया फेव्हरिट मानली जाते आहे, या मॅचमध्येही उलटफेर होऊ शकतो का?

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, ‘मी फेवरेट आणि अंडर डॉग यावर विश्वास ठेवत नाही. मी सामन्याच्या दिवसाबद्दल विचार करतो, जर तुम्ही त्या दिवशी योग्य मानसिकतेने मैदानावर पोहोचला नाही तर परिस्थिती ठीक होणार नाही. जर तुम्ही योग्य माईंड सेटसह मैदानावर जात असाल आणि तुम्हाला काय करायचे आहे हे माहित असेल तर तुर सर्व काही तुमच्याप्रमाणे होईल’.

तो पुढे म्हणाला की, 'जेव्हाही विश्वचषकासारख्या स्पर्धा होतात तेव्हा बाहेर नेहमी अशी चर्चा होते की, हा फेव्हरेट आहे किंवा हा अंडरडॉग आहे. क्वालिफायरमधून एक चांगले उदाहरण समोर आले आहे, की अंडरडॉग वगैरे काही नसते. तुम्हाला फक्त सामन्याच्या दिवशी चांगले खेळावे लागेल".

पुढील बातम्या