मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Melbourne Weather Update: कोट्यवधी चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामना होणार?

Melbourne Weather Update: कोट्यवधी चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामना होणार?

Oct 22, 2022, 10:48 AM IST

    • Melbourne Ind vs Pak T20 World Cup 2022 Weather Forecast Update: सुपर १२ फेरीला आजपासून सुरुवात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना २३ ऑक्टोबरल होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण क्रिकेट चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मेलबर्नमधील पाऊस थांबला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
Ind vs Pak T20 World Cup 2022

Melbourne Ind vs Pak T20 World Cup 2022 Weather Forecast Update: सुपर १२ फेरीला आजपासून सुरुवात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना २३ ऑक्टोबरल होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण क्रिकेट चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मेलबर्नमधील पाऊस थांबला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

    • Melbourne Ind vs Pak T20 World Cup 2022 Weather Forecast Update: सुपर १२ फेरीला आजपासून सुरुवात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना २३ ऑक्टोबरल होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण क्रिकेट चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मेलबर्नमधील पाऊस थांबला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

ICC T20 विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीला आज (२२ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. सुपर १२ मधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडय यांच्यात आज खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, यावेळेस या दोन्ही संघांपेक्षा मेलबर्नमधील पावसाची जास्त चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांच्या मनात वारंवार येत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये सतत पाऊस पडत होता. तसेच २३ ऑक्टोबरला म्हणजेच सामन्याच्या दिवशीदेखील मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता अधिक होती. पण मेलबर्नमधील हवामानाच्या ताज्या अपडेटवरुन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मेलबर्नमध्‍ये बराच वेळपासून पाऊस थांबला आहे. सुर्यदर्शन देखील झाले आहे आणि आता पुढचे दोन दिवस पावसाची शक्‍यता खूपच कमी आहे.

भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी मेलबर्नमध्ये जवळपास ६ तास सतत पाऊस पडत होता. मेलबर्नमध्ये आकाश ढगाळ होते, त्यामुळे रविवारपर्यंत हवामानात बदल होणार नाही, असे वाटत होते. पण आता अचानक वातावरण बदलले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा शनिवारी जेव्हा पत्रकार परिषदेत आला त्यावेळी मेलबर्नमध्ये पाऊस थांबला होता, तसेच सूर्यदर्शन देखील झाले होते.

सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता कमी

Weather.Com नुसार, आता २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता कमी झाली आहे. या आधीच्या हवामान अंदाजानुसार सामन्याच्या दिवशी ८० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. मात्र, ती शक्यता आता २५ टक्क्यांच्या आसपास गेली आहे. पण रविवारी रात्री ९० टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्ताना सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता तर ऑस्ट्रेलियन वेळेनुसारसंध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

'शेवटच्या क्षणापर्यंत वाट पहावी लागेल'

दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा अद्याप केलेला नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला, ‘येथील हवामान दर मिनिटाला बदलत आहे. उद्या सकाळी हवामानाच्या आधारे आम्ही आमची प्लेइंग इलेव्हन ठरवू. यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागेल’.

टीम इंडिया ३ दिवसांपूर्वीच मेलबर्नला पोहोचली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तीन दिवस आधी मेलबर्नला पोहोचला होता. टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवून धमाकेदार सुरुवात करायची आहे. गेल्यावर्षी दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मेलबर्नमध्ये उतरणार आहे.

पुढील बातम्या