मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: रोहित शर्मानं व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरला दिलं 'हे' स्पेशल गिफ्ट, पाहा VIDEO

T20 World Cup: रोहित शर्मानं व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरला दिलं 'हे' स्पेशल गिफ्ट, पाहा VIDEO

Oct 22, 2022, 11:44 AM IST

    • Team India Meet Governor Linda Dessau: T20 विश्वचषकातील आपली मोहिम सुरु करण्यापूर्वी भारतीय संघ व्हिक्टोरिया हाऊसमध्ये पोहोचला. त्या ठिकणी संपूर्ण संघ राज्यपाल लिंडा डेसाऊ यांना भेटला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने संघाची जर्सी भेट गव्हर्नर यांना भेट दिली.
Team India Meet Governor Linda Dessau

Team India Meet Governor Linda Dessau: T20 विश्वचषकातील आपली मोहिम सुरु करण्यापूर्वी भारतीय संघ व्हिक्टोरिया हाऊसमध्ये पोहोचला. त्या ठिकणी संपूर्ण संघ राज्यपाल लिंडा डेसाऊ यांना भेटला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने संघाची जर्सी भेट गव्हर्नर यांना भेट दिली.

    • Team India Meet Governor Linda Dessau: T20 विश्वचषकातील आपली मोहिम सुरु करण्यापूर्वी भारतीय संघ व्हिक्टोरिया हाऊसमध्ये पोहोचला. त्या ठिकणी संपूर्ण संघ राज्यपाल लिंडा डेसाऊ यांना भेटला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने संघाची जर्सी भेट गव्हर्नर यांना भेट दिली.

भारतीय संघ T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडियाचा पहिला सामना रविवारी २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी संघ व्हिक्टोरियाच्या गव्हर्नर हाऊसमध्ये पोहोचला. टीमचा हा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विटरवर शेअर केला आहे. येथे संपूर्ण भारतीय संघाने व्हिक्टोरियाच्या गव्हर्नर लिंडा डेसाऊ (Linda Dessau) यांची भेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कॅप्टन रोहित शर्माने भेट दिली टीम इंडियाची जर्सी

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माने गव्हर्नर लिंडा डेसाऊ यांना भारतीय संघाची जर्सी भेट दिली. गिफ्ट देण्यापूर्वी संपूर्ण टीमने फोटोसेशन देखील केले. जर्सी भेट दिल्यानंतर लिंडा यांनी भारतीय संघाबद्दल एक शानदार स्पीच दिले. यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडूंनी लिंडा डेसाऊ यांच्याशी संवाद साधला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसोबत सेल्फीदेखील घेतली.

भारतीय संघाने आपला पहिला अधिकृत सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. संघाने हा सामना ६ धावांनी जिंकला. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सराव सामना पावसामुळे होऊ शकला नाही. याआधी टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले होते. त्यामध्ये एका सामन्यात भारताने विजय मिळवला तर दुसऱ्या टीम इंडियात पराभूत झाली.

टीम इंडिया ३ दिवसांपूर्वीच मेलबर्नला पोहोचली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तीन दिवस आधी मेलबर्नला पोहोचला होता. टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवून धमाकेदार सुरुवात करायची आहे. गेल्यावर्षी दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मेलबर्नमध्ये उतरणार आहे.

पुढील बातम्या