मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ruled Out Players : मुंबई-चेन्नईसह आठ संघांना दुखापतीचं ग्रहण; कोणते खेळाडू झाले आयपीएलबाहेर?

Ruled Out Players : मुंबई-चेन्नईसह आठ संघांना दुखापतीचं ग्रहण; कोणते खेळाडू झाले आयपीएलबाहेर?

Apr 04, 2023, 06:46 PM IST

    • Ruled Out Players In IPL 2023 : आयपीएलचे फक्त सहाच सामने झालेले असताना तब्बल आठ संघातील खेळाडूंना दुखापत झाली आहे.
Ruled Out Players List IPL 2023 (PTI)

Ruled Out Players In IPL 2023 : आयपीएलचे फक्त सहाच सामने झालेले असताना तब्बल आठ संघातील खेळाडूंना दुखापत झाली आहे.

    • Ruled Out Players In IPL 2023 : आयपीएलचे फक्त सहाच सामने झालेले असताना तब्बल आठ संघातील खेळाडूंना दुखापत झाली आहे.

Ruled Out Players List IPL 2023 : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यात आली होती. त्यानंतर आता भारतात आयपीएलची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली असून सहा सामने निर्विघ्न पार पडले आहे. परंतु आता आयपीएलमधील तब्बल आठ सामन्यांना कोरोना नाही तर दुखापतीचं ग्रहण लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईचा जसप्रीत बुमराह, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि बंगळुरुचा रजत पाटीदार हे खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाले आहे. याशिवाय गुजरात टायटन्सची जान असलेला केन विलियमसन देखील दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळं आता आयपीएलचे सहाच सामने झालेले असताना कोणते खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालेत, जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गुजरात टायटन्स-

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा प्रमुख फलंदाज असलेला केन विलियमसन दुखापतग्रस्त झाला आहे. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळं तो आयपीएलमधील आगामी सामने खेळणार नाहीये. त्यामुळं आता हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स-

कर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त झाल्यामुळं केकेआरने नितीश राणा याच्याकडे कर्णधारपद दिलं आहे. श्रेयस अय्यर आयपीएलचा यंदाचा हंगाम खेळणार नसल्यामुळं केकेआरला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स-

मुंबई इंडियन्सचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्यामुळं तो यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाहीये. त्यानंतर आता पहिल्याच सामन्यात मुंबईच्याच झाय रिचर्डर्सनला दुखापत झाली. त्यामुळं आता रोहित शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज-

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज मुकेश चौधरीला दुखापत झाली आहे. त्यामुळं तो आयपीएलचा संपूर्ण खेळणार नसल्याचं सीएसकेकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता ऑलराऊंडर कायल जेमिसन हा देखील स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळं सीएसके संकटात सापडण्याची चिन्हं आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-

आयपीएलच्या मागच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हिरो ठरलेला रजत पाटीदार या हंगामातून बाहेर झाला आहे. सराव सामन्यावेळी झालेल्या दुखापीतमुळं पाटीदार आयपीएलमधून बाहेर झाला आहे. याशिवाय विल जॅक्स हा देखील दुखापतीमुळं आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.

दिल्ली कॅपिटल्स-

काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडला जात असताना दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अजूनही त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळं तो आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळं दिल्लीनं ऋषभ पंतच्या जागी दोन आफ्रिकन खेळाडूंना भारतात बोलावलं आहे.

पंजाब किंग्ज-

पंजाब किंग्ज संघाचा तडाखेबंद खेळाडू जॉनी बेयरस्टो दुखापतीमुळं आयपीएलमध्ये खेळणार नाहीये. त्यामुळं आता पंजाबच्या फलंदाजीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजस्थान रॉयल्स-

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा दुखापतग्रस्त असल्यामुळं तो यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याचं संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता राजस्थानला नव्या गोलंदाजांना संधी द्यावी लागणार आहे.

पुढील बातम्या