मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA 1st T20: इज्जतीचा फालूदा... स्टेडियमचं वीज कनेक्शन तोडलं, जनरेटरवर होणार क्रिकेट सामना

IND vs SA 1st T20: इज्जतीचा फालूदा... स्टेडियमचं वीज कनेक्शन तोडलं, जनरेटरवर होणार क्रिकेट सामना

Sep 22, 2022, 12:20 PM IST

    • India vs South Africa greenfield stadium: ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. अशा स्थितीत हा सामना कसा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, वीज कनेश्न तोडल्याने सामना इतर ठिकाणी तर हलवला जाणार नाही, ना अशी भीतीही चाहत्यांना वाटू लागली आहे.
IND vs SA

India vs South Africa greenfield stadium: ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. अशा स्थितीत हा सामना कसा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, वीज कनेश्न तोडल्याने सामना इतर ठिकाणी तर हलवला जाणार नाही, ना अशी भीतीही चाहत्यांना वाटू लागली आहे.

    • India vs South Africa greenfield stadium: ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. अशा स्थितीत हा सामना कसा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, वीज कनेश्न तोडल्याने सामना इतर ठिकाणी तर हलवला जाणार नाही, ना अशी भीतीही चाहत्यांना वाटू लागली आहे.

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियावरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. यानंतर याच महिन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आफ्रिकेविरुद्ध आधी टी-20 मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २८ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, या तिरुवनंतपुर सामन्याआधी मोठे संकट उभे ठाकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. अशा स्थितीत हा सामना कसा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, वीज कनेश्न तोडल्याने सामना इतर ठिकाणी तर हलवला जाणार नाही, ना अशी भीतीही चाहत्यांना वाटू लागली आहे.

पण याबाबत केरळ क्रिकेट असोसिएशनच्या (KCA) एका अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, “हा सामना कोणत्याही परिस्थितीत ग्रीनफिल्डवरच आयोजित केला जाईल. मॅच पूर्ण करण्यासाठी आम्हाला जनरेटरचाही आधार घ्यावा लागला तरी तो आम्ही घेऊ ”. या सामन्यासाठी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

वीज असो वा नसो सामना ग्रीन फिल्डवरच होणार

केसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'वीज असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत हा सामना ग्रीन फिल्डवरच खेळवला जाईल. वीज नसेल तर जनरेटरच्या मदतीने सामना आयोजित केला जाईल. सामन्याच्या आधी आणि इतर तयारीसाठी विजेची गरज असते. त्यासाठी बॅकअप तयार करण्यात आला आहे. जनरेटरही लावला जाईल. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना आयोजित करायचा आहे".

अडिच कोटींचे वीज बील थकित

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर अडीच कोटी रुपयांहून अधिकचे बिल थकित आहे. त्यामुळे केरळच्या वीज मंडळाने स्टेडियमचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्याच वेळी, ग्रीनफील्ड स्टेडियम केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड (KSFL) ने वीज बिल भरल्याचे सांगितले आहे.

KSFL चे अधिकारी कृष्ण प्रसाद म्हणाले, 'येथे एक थिएटर आणि एक सभागृह आहे. त्याचे वीज बिल थकीत आहे. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. मग इतरांची बिले आम्ही का भरायची?' आत्तापर्यंत ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ३ आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यापैकी भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे.

पुढील बातम्या