मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Playing-11: नॉर्खिया-रबाडासमोर टीम इंडियाची कसोटी, अक्षरऐवजी आज दीपक हुड्डा खेळणार?

IND vs SA Playing-11: नॉर्खिया-रबाडासमोर टीम इंडियाची कसोटी, अक्षरऐवजी आज दीपक हुड्डा खेळणार?

Oct 30, 2022, 11:12 AM IST

    • India Vs South Africa prediction playing 11: T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये एक बदल करू शकते. अक्षर पटेल ऐवजी आज संघात दीपक हुड्डाला संधी मिळू शकते.
IND vs SA Playing-11

India Vs South Africa prediction playing 11: T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये एक बदल करू शकते. अक्षर पटेल ऐवजी आज संघात दीपक हुड्डाला संधी मिळू शकते.

    • India Vs South Africa prediction playing 11: T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये एक बदल करू शकते. अक्षर पटेल ऐवजी आज संघात दीपक हुड्डाला संधी मिळू शकते.

IND Vs SA T20 World Cup Dream11 Playing 11 Prediction: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. गट २ मध्ये गटात अव्वल स्थानावर राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागेल. या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकतो. टीम इंडिया अक्षर पटेलऐवजी दीपक हुड्डाला प्लेईंग ११ मध्ये संधी देण्याची शक्यता आहे. हा सामना पर्थ येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी ४:३० वाजता सुरु होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आजच्या सामन्यात दीपक हुड्डाला संधी देण्यामागचे कारण खूप खास आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टॉप ७ फलंदाजांपैकी ४ डावखुरे आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर गोलंदाजी करताना अक्षर पटेलपेक्षा दीपक हुड्डा अधिक प्रभावी ठरू शकतो. हुड्डा ऑफ-स्पिनर असण्यासोबतच फलंदाजीत अक्षर पटेलपेक्षा चांगला पर्याय आहे.

चहलला संधी नाहीच

तसेच, या सामन्यातही युझवेंद्र चहलला संधी मिळण्याची शक्यता नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या टी-20 सामन्यात आर अश्विनने अतिशय तगडी गोलंदाजी केली होती. त्यामुळे मॅनेजमेंट त्याला बाहेर बसवण्याचा कोणताही धोका पत्करणार नाही.

केएल राहुलसाठी महत्वाचा सामना

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताचा उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर केएल राहुलसाठीही खूप महत्त्वाचा आहे. राहुलची बॅट आतापर्यंत शांत आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राहुलला दुहेरी आकडाही पार करता आलेला नाही. या सामन्यातही राहुल अपयशी ठरला तर टीम इंडिया पुढील सामन्यात ऋषभ पंतला संधी देऊ शकते.

हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असल्याने टीम इंडिया आपल्या कोणत्याही प्रमुख खेळाडूला विश्रांती देणार नाही. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहेत. वेगवान गोलंदाजीची कमान भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे असेल.

टीम इंडिया प्लेईंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल/दीपक हुड्डा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

पुढील बातम्या