मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Weather Report: अनेक मोठ्या संघांना पावसाचा दणका, भारत-आफ्रिका सामन्याचं काय होणार? पाहा

IND vs SA Weather Report: अनेक मोठ्या संघांना पावसाचा दणका, भारत-आफ्रिका सामन्याचं काय होणार? पाहा

Oct 30, 2022, 10:32 AM IST

    • India Vs South Africa, Perth Weather Report: गुणतालिकेत भारत दोन सामन्यांंनंतर ४ गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेट +१.४२५ आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +५.२०० आहे. झिम्बाब्वेचे देखील दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीने तीन गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये (+०.०५०) मागे आहेत.
IND vs SA Weather Report

India Vs South Africa, Perth Weather Report: गुणतालिकेत भारत दोन सामन्यांंनंतर ४ गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेट +१.४२५ आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +५.२०० आहे. झिम्बाब्वेचे देखील दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीने तीन गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये (+०.०५०) मागे आहेत.

    • India Vs South Africa, Perth Weather Report: गुणतालिकेत भारत दोन सामन्यांंनंतर ४ गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेट +१.४२५ आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +५.२०० आहे. झिम्बाब्वेचे देखील दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीने तीन गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये (+०.०५०) मागे आहेत.

India Vs South Africa Weather Forecast, Pitch Report: टी-२० विश्वचषकात आजचा रविवारी (३० ऑक्टोबर) सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. हा सामना पर्थ येथे होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला चिरडण्यासाठी उतरणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते. झिम्बाब्वेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाहून गेला होता. पर्थ येथे दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या या टी-20 विश्वचषकातील अनेक महत्त्वाचे सामने पावसामुळे प्रभावित झाले आहेत. तर भारत आणि आफ्रिका सामन्याच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने अंशतः ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत भारताचा सामना होणार नाही. पण पावसाचा परिणाम पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यावर दिसून येईल. पाकिस्तान आणि नेदरलँड सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल.

पर्थमधील भारताचा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. Weather.com नुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान १३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील.

पीच रिपोर्ट (India Vs South Africa, Perth pitich Report)

याशिवाय पीच रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर, पीचचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. पर्थ येथील पीचवर चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येतो त्यामुळे फलंदाज मोठे फटके सहज मारू शकतात. मात्र, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना खूप स्विंग मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

पुढील बातम्या