मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shoaib Akhtar: विराट कोहलीनं टी २० क्रिकेट खेळणं बंद करावं, असं शोएब अख्तर का म्हणाला?

Shoaib Akhtar: विराट कोहलीनं टी २० क्रिकेट खेळणं बंद करावं, असं शोएब अख्तर का म्हणाला?

Oct 26, 2022, 12:13 PM IST

  • shoaib akhtar on virat kohli: टी-ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना गाजवणाऱ्या विराट कोहली याच्याबद्दल शोएब अख्तर यानं मोठं विधान केलं आहे.

Shoaib Akhtar - Virat Kohli

shoaib akhtar on virat kohli: टी-ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना गाजवणाऱ्या विराट कोहली याच्याबद्दल शोएब अख्तर यानं मोठं विधान केलं आहे.

  • shoaib akhtar on virat kohli: टी-ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना गाजवणाऱ्या विराट कोहली याच्याबद्दल शोएब अख्तर यानं मोठं विधान केलं आहे.

shoaib akhtar on virat kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्मात आहे. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरोधात जिगरबाज खेळी करून त्यानं भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीचं कौतुक होत असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांना विराटला टी-२० मधून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, शोएबनं त्याच्या वक्तव्यावर खुलासाही केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना शोएब अख्तरनं यावर भाष्य केलं आहे. ‘विराट हा एक महान फलंदाज आहे. त्यानं आपली सर्व शक्ती छोट्या फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये घालवू नये. विराटनं पाकिस्तानच्या विरोधात आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी खेळी केली. मैदानावर असताना त्याच्यातील आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. त्याला सूर गवसला आहे. मधल्या काळात विराटवर खूप टीकाही झाली होती. कर्णधारपद गमवावं लागलं. पण आता त्यानं जोरदार कमबॅक केलं आहे. मात्र, त्यानं केवळ टी-२० वरच लक्ष केंद्रित करू नये. असाच खेळत राहिला तर एकदिवसीय सामन्यातही तो सहज शतकं झळकवू शकतो, असं शोएब म्हणाला. 

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरनं विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध केलेल्या नाबाद ८२ धावांच्या खेळीचं कौतुक केलं. त्याच्या खेळीमुळंच मेलबर्नमध्ये भारताला पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवता आला, असंही शोएब म्हणाला.

पुढील बातम्या