मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pele Health Update : दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती गंभीर; रुग्णालयात चाहत्यांची गर्दी

Pele Health Update : दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती गंभीर; रुग्णालयात चाहत्यांची गर्दी

Dec 26, 2022, 07:18 AM IST

    • Pele Health Update : ह्रदयविकाचा त्रास जाणवल्यानंतर पेले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे.
Pele Health Condition Update Live (HT)

Pele Health Update : ह्रदयविकाचा त्रास जाणवल्यानंतर पेले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे.

    • Pele Health Update : ह्रदयविकाचा त्रास जाणवल्यानंतर पेले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे.

Pele Health Condition Update Live : ब्राझीलचे प्रसिद्ध आणि दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ह्रदयविकाराचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. यासंदर्भातली माहिती त्यांच्या मुलानं इन्स्टाग्रामवरून शेयर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. याशिवाय अनेक लोकांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. पेले हे हार्टची समस्या आणि कर्करोगाच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यामुळं आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ब्राझीलमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पेले यांचा मुलगा एडिन्हों यांनी रुग्णालयातील फोटो शेयर करत चाहत्यांना ते आजारी असल्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी वडिलांच्या हातात हात देऊन लिहिलं आहे की, पप्पा, तुम्ही माझी शक्ती आहात. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या स्वास्थासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. गेल्या वर्षीच पेले यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी पेले यांना कोलोन ट्यूमर झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना कर्करोगासह किडनी आणि ह्रदयाशी संबंधित समस्या जाणवत होत्या. आता त्यांना असलेला आजार हा केवळ एका अवयवापुरता मर्यादित नसून सर्व शरीरात पसरल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पेलेंनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला होता...

पेले हे फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू मानले जातात. त्यांनी ब्राझीलकडून खेळताना १९५८, १९६२ आणि १९७० साली ब्राझीलला फिफा वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यांनी त्यांच्या फुटबॉलच्या कारकिर्दीत एकूण १२८२ गोल केलेले आहेत. याशिवाय त्यांना जगभरातून अनेक चाहत्यांनी आणि निवेदित खेळाडूंनी आदर्श मानलं होतं. त्यामुळं आता ते आजारी पडल्यानं त्यांच्या स्वास्थासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे.

विभाग

पुढील बातम्या