
कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेचा समारोप झाला आहे. मेस्सीच्या अर्जेंटिनाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरक्कन संघाच्या खेळाडूंनी घेतलेल्या स्तुत्य निर्णयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मोरोक्कोने फिफा विश्वचषकात मिळालेली बक्षीस रक्कम गरिबांना दान करण्याच्या निर्णय घेतला आहे. ही रक्कम तब्बल २२ मिलियन डॉलर्स म्हणजेच १८१ कोटी रुपये इतकी आहे.
स्पोर्ट्स पेआऊट्सच्या रिपोर्टनुसार, मोरोक्कोला फिफा वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय केल्याबद्दल २.५ मिलियन डॉलर्स मिळाले होते. तसेच, मोरोक्कोने या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून २२ मिलियन डॉलर्स मिळाले होते. ही बक्षिसाची रक्कम त्यांनी गरिबांमध्ये दान केले आहे.
मोरोक्कोने खेळातूनही जिंकली जगाची मनं
फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये मोरोक्कोचा प्रवास स्वप्नवत राहिला आहे. कतारमध्ये २८ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळले गेले. अर्जेंटिना या विश्वचषकाचा विजेता ठरला. तर फ्रान्स उपविजेता. त्याचवेळी क्रोएशियाने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. तर मोरोक्कोला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मोरोक्कन संघ प्रथमच फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. तसेच फिफा वर्ल्डकपची सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकन संघदेखील ठरला. सेमी फायनलमध्ये मोरोक्कोच्या खेळाडूंनी फ्रान्सला कडवी झुंज दिली, पण शेवटी फ्रान्सने त्यांचा २-० असा पराभव करत फायनल गाठली. त्यानंतर वर्ल्डकपमधील तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोची लढत क्रोएशियाशी झाली. या सामन्यातही मोरोक्कोचा २-१ असा पराभव झाला. मात्र, तरी त्यांच्या चाहत्यांना मोरोक्कोच्या संघाच्या कामगिरीवर पूर्ण समाधान आहे. यामुळेच त्यांचे मोरोक्कोत जंगी स्वागत करण्यात आले.
मोरोक्कोनं बलाढ्य संघांना घरी पाठवलं
मात्र, तत्पूर्वी, मोरोक्कोच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये स्पेनचा पराभव केला होता. त्यानंतर राऊंड ऑफ १६ फेरीत त्यांनी बेल्जियमला बाहेरचा रस्ता दाखवला तर क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाला वर्ल्डकपमधून बाहेर काढले.
मोरोक्कोच्या चाहत्यांना संघाचं प्रचंड कौतुक
मोरोक्कोचे चाहते आपल्या संघाचे हे विशेष यश कधीच विसरणार नाहीत. यामुळेच मोरोक्कन देशवासियांनी संघाच्या अनपेक्षित कामगिरीचा मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. संघ मायदेशात पोहोचल्यानंतर चाहत्यांनी रबतच्या रस्त्यावर खुल्या बसधून खेळाडूंची व्हिक्ट्री परेड काढण्यात आली होती. तसेच हजारो लोकांनी खेळाडूंची झलक पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्हीबाजून गर्दी केली होती. त्यांच्या हातात झेंडे होते आणि ते गाण्यात आणि नाचण्यात मग्न होते.
संबंधित बातम्या
