Argentina Victory Parade: कतारला चपराक, व्हिक्ट्री परडेमध्ये अर्जेंटिनाच्या महिलांनी ब्रा काढल्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Argentina Victory Parade: कतारला चपराक, व्हिक्ट्री परडेमध्ये अर्जेंटिनाच्या महिलांनी ब्रा काढल्या

Argentina Victory Parade: कतारला चपराक, व्हिक्ट्री परडेमध्ये अर्जेंटिनाच्या महिलांनी ब्रा काढल्या

Updated Dec 25, 2022 05:45 PM IST

Argentinians Victory Parade womens Celerated No Bra Day: अर्जेंटिनाच्या महिलांनी कतारला जोरदार चपराक लगावली आहे. फिफा वर्ल्डकप दरम्यान कतारमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. विशेषत: महिलांच्या कपड्यांवरून अनेक नियम लादण्यात आले होते. याचा निषेध म्हणून महिलांनी अर्जेंटिना संघाच्या व्हिक्ट्री परेडच्या दिवशी नो ब्रा डे साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने महिला आपल्या ब्रा काढून महिला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दिसल्या.

Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade With
Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade With

अर्जेंटिनामध्ये FIFA विश्वचषक २०२२ चा फिव्हर अजूनही कायम आहे. कारण अर्जेंटिनाचा संघ वर्ल्ड चॅम्पियन बनून मायदेशात परतला आहे. अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी लोकांनी (२० डिसेंबर) रस्त्यावर तुफान गर्दी केली होती. यानंतर संपूर्ण संघाची खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या व्हिक्ट्री परेडमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

विशेष म्हणजे, या मिरवणूकीत अर्जेंटिनाच्या महिलांना कतारला जोरदार चपराक लगावली आहे. फिफा वर्ल्डकप दरम्यान कतारमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. विशेषत: महिलांच्या कपड्यांवरून अनेक नियम लादण्यात आले होते. याचा निषेध म्हणून महिलांनी व्हिक्ट्री परेडच्या दिवशी नो ब्रा डे साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने महिला आपल्या ब्रा काढून महिला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दिसल्या.

दरम्यान, अर्जेंटिनाने विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये एका महिला फॅनने तिची ब्रा उतरवून जल्लोष केला होता. त्यानंतर त्या महिलेला अटक करण्यात आली होती. तेव्हादेखील संपूर्ण जगाने सोशल मीडियावर कतारला फटकारले होते. व्हिक्ट्री परेडमध्ये महिलांनी त्या फॅनचेही जोरदार समर्थन केले आणि अनेकांनी स्वतःचे न्यूड व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले होते.

टी शर्ट, ब्रा काढून हवेत भिरकावल्या

फिफा वर्ल्ड कपमध्ये महिला चाहत्यांची क्रेझ नेहमीच पाहायला मिळते आणि महिला त्यात उत्साहाने भाग घेतात. मात्र, इस्लामिक देश असल्याने कतारमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. ज्यामध्ये महिलांच्या पेहराव आणि त्यांच्या सार्वजनिक आचरणाबाबत अनेक नियम करण्यात आले होते. कपडे, घोषणा, LGBTQ संबंधांना प्रोत्साहन देणारे पोस्टर्स यावरही बंदी होती. कतारच्या या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी अर्जेंटिनाच्या महिलांनी व्हिक्ट्री परडेमध्ये न्युड होत सहभाग नोंदवला. यावेळी अनेक महिलांनी आपले ब्रा आणि टी-शर्ट काढून हवेत फिरवले आणि त्यांच्या टीमला पाठिंबा दिला.

Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade
Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade

टॉपलेस झाल्याने कतारकडून अर्जेंटिनाच्या महिला फॅनला अटक

वास्तविक, फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या गोंझालो मॉन्टिएलने विजयी किक मारली. तेव्हा खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. यावेळी कॅमेरा प्रेक्षकांमध्ये गेला. तेव्हा कॅमेऱ्यात एक महिला फॅन पूर्ण टॉपलेस झालेली दिसली. मोठ्या स्क्रिनवरील दृष्य पाहून सर्वजण थक्क झाले. त्या महिलेच्या हातात अर्जेंटिनाची जर्सी दिसत होती.

Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade
Argentinian Women Celebrate No Bra Day in Victory Parade

त्यानंतर त्या महिला फॅनला कतार प्रशासनाने अटक करून तुरुंगात टाकल्याची माहिती समोर आली. तेव्हापासून महिला अधिकारांशी संबंधित संघटना आणि सामान्य लोक सोशल मीडियावर कतारवर जोरदार टीका करत आहेत. व्हिक्टरी परेडमध्ये अर्जेंटिनाच्या महिला चाहत्यांनी त्या महिलेलाही पाठिंबा दर्शवला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या