मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : मृत्यूनंतर प्रेत योनीत कोणता आत्मा जातो?, कोणता भटकत राहातो?

Garuda Purana : मृत्यूनंतर प्रेत योनीत कोणता आत्मा जातो?, कोणता भटकत राहातो?

May 17, 2023, 12:40 PM IST

  • Garuda Purana On Death : सनातन धर्मात गरुड पुराणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. गरुडपुराण १८ महापुराणांपैकी एक म्हणून गरुडपुराणाकडे पाहिलं जातं.

गरूड पुराण (Pinterest)

Garuda Purana On Death : सनातन धर्मात गरुड पुराणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. गरुडपुराण १८ महापुराणांपैकी एक म्हणून गरुडपुराणाकडे पाहिलं जातं.

  • Garuda Purana On Death : सनातन धर्मात गरुड पुराणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. गरुडपुराण १८ महापुराणांपैकी एक म्हणून गरुडपुराणाकडे पाहिलं जातं.

सनातन धर्मात गरुड पुराणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. गरुडपुराण १८ महापुराणांपैकी एक म्हणून गरुडपुराणाकडे पाहिलं जातं. गरुडपुराणात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला मृत्यूबाबत काय सांगतात याचा उल्लेख मिळतो. मृत्यू किंवा मृत्यूपश्चात होणाऱ्या घटनांचं वर्णनही आपल्याला गरुड पुराणात पाहायला मिळतं.

ट्रेंडिंग न्यूज

एका दिवसात किती भाविक चारधामचे दर्शन घेऊ शकतील? सध्या सर्व धामांचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या रात्री घरात या ठिकाणी दिवे लावा, धनाची आवक वाढेल

Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Akshaya Tritiya Wishes : कुटुंबातील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी द्या अक्षय्य तृतीयेला या खास शुभेच्छा

गरुड पुराण हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, कर्म, आत्मा, पाप-पुण्य, आचार-नियम, धर्म आणि ज्ञान यांच्याशी संबंधित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच आत्मा मानवी योनीत जातो आणि मृत्यूनंतर प्रेतयोनीत जातो. अशी कोणती कर्म आहेत जी केल्याने आत्मा प्रेत योनीत जातो याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

कोणती कर्म केल्यावर आत्मा प्रेत योनीत जातो?

गरुड पुराणानुसार उल्लेख केल्यानुसार जो आत्मा नैसर्गिक स्वरूपात शरीराचा त्याग करत नाही तो आत्मा किवा ज्या आत्म्याला शांती मिळत नाही तो आत्मा प्रेत योनीत जातो. काही आत्मे असे असतात जे आपल्या वाईट कर्मामुळे किंवा केलेल्या दृष्कृत्यांमुळे मुक्तीच्या मार्गात जात नाहीत आणि असे आत्मे मग प्रेत योनीत राहातात आणि सदैव भटकत राहातात. असे आत्मे नेहमी इतरांना त्रास देत असतात.

एखाद्यावर कुणाची तरी सावली पडली आहे असं आपण आपल्या आसपास ऐकतो. काही व्यक्तीतर अत्यंत विचित्र वागताना किंवा तसं वर्तन करताना आपण पाहातो. अनेकदा आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही अशी कृत्य ही माणसं करतात. या माणसांवरही कुणाचीतरी सावली पडली असल्याचं आपण म्हणतो. काहींना भटकणारे आत्मे पाहायलाही मिळाल्याचं ऐकायला मिळतं.

मात्र जे आत्मे नैसर्गिक मार्गीने शरीर सोडतात किंवा अनैसर्गिक स्वरूपात शरीराचा त्याग करतात. त्या आत्म्यांना मुक्ती मिळावी म्हणून शास्त्र आपल्याला मृत व्यक्तीचं पिंडदान करणं आणि श्राद्ध घालण्यास सांगतं. नियमानुसार पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते असं गरूड पुराणातही सांगण्यात आलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या