मराठी बातम्या  /  धर्म  /  Paush Putrada Ekadashi: पुत्रदा एकादशी कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, कथा आणि या दिवसाचं महत्व

Paush Putrada Ekadashi: पुत्रदा एकादशी कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, कथा आणि या दिवसाचं महत्व

Jan 17, 2024, 02:56 PM IST

  • Paush Putrada Ekadashi 2024: कृष्व व शुक्ल पक्षाची अकरावी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम व फलदायी आहे असे सांगितले जाते. जाणून घ्या पौष पुत्रदा एकादशी व्रत कधी आहे.

Paush Putrada Ekadashi 2024

Paush Putrada Ekadashi 2024: कृष्व व शुक्ल पक्षाची अकरावी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम व फलदायी आहे असे सांगितले जाते. जाणून घ्या पौष पुत्रदा एकादशी व्रत कधी आहे.

  • Paush Putrada Ekadashi 2024: कृष्व व शुक्ल पक्षाची अकरावी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम व फलदायी आहे असे सांगितले जाते. जाणून घ्या पौष पुत्रदा एकादशी व्रत कधी आहे.

हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

पौष पुत्रदा एकादशी मुहूर्त

एकादशी प्रारंभ - २० जानेवारी २०२४ शनिवार रात्री ७ वाजून २६ मिनिटे

एकादशी समाप्ती - २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी रात्री ७ वाजून २६ मिनिटे.

उदयातिथीनुसार २१ तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत आचरले जाईल.

पौष पुत्रदा एकादशी महत्व

पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते.

Ekadashi 2024: वर्ष २०२४ मध्ये कोणत्या तारखेला कोणती एकादशी जाणून घ्या

पुत्रदा एकादशी पूजा पद्धत

पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधीवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. यादिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि उपवास सोडावा.

Durga Ashtami: नववर्षातली पहिली मासिक दुर्गाष्टमी; जाणून घ्या शुभ योग, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्व

पुत्रदा एकादशी पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, महिष्मती नावाच्या राज्यात महाजित नावाचा एक शांतीप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा राज्य करीत होता. मात्र त्याला स्वत:च मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा होता.

मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो याजन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त व्हायचे असेल तर, पौष शुक्ल एकादशीला व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांना संततीप्राप्ती होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार, प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या