Ekadashi 2024: वर्ष २०२४ मध्ये कोणत्या तारखेला कोणती एकादशी जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ekadashi 2024: वर्ष २०२४ मध्ये कोणत्या तारखेला कोणती एकादशी जाणून घ्या

Ekadashi 2024: वर्ष २०२४ मध्ये कोणत्या तारखेला कोणती एकादशी जाणून घ्या

HT Marathi Desk HT Marathi
Updated Dec 08, 2023 05:00 PM IST

Ekadashi tithi 2024: प्रत्येक महिन्यात २ अशा प्रकारे वर्षभरात २४ एकादशी तिथी असतात. ज्या वर्षी अधिक महिना असेल त्या वर्षी एकूण २६ एकादशी तिथी पडतात. लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होईल. जाणून घेऊ या नवीन वर्षातील एकादशी तिथीच्या तारखा.

Ekadashi 2024
Ekadashi 2024

Ekadashi 2024 date : अनेक घराघरात एकादशी अत्यंत मनोभावे केली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा, त्यानंतर उपवास, हरिनामाचा जप करण्यात येतो. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व असतं. भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो. 

एकादशी हा हिंदू पंचागानुसार प्रतिपदेपासून सुरू होणार्‍या पक्षातला अकरावा दिवस असतो. हिंदू पंचागानुसार महिन्यातून दोन एकादशी येतात. या महिनाभरातल्या नेहमीच्या एकादशी करण्याची परंपरा आहे. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षभरात २४ एकादशा येतात. अधिक महिना आला तर त्या वर्षात २६ एकादशी तिथी असतात. प्रत्येक एकादशी तिथीला त्याचे वेगळे नाव आहे त्याचे खास महत्व शास्त्रात नमूद केले आहे.

Utpanna ekadashi 2023: आज उत्पत्ती एकादशी, कशी कराल पूजा? जाणून घ्या व्रत कथा

एकादशी तिथीच्या तारखा काही वेळेला कळत-नकळत आपण विसरून जातो. तेव्हा नवीन वर्षात कोणत्या तारखेला कोणती एकादशी आहे जाणून घ्या.

वर्ष २०२४ च्या एकादशीच्या तारखा

सफला एकादशी (मार्गशीर्ष कृष्ण) ७ जानेवारी २०२४

पुत्रदा एकादशी (पौष शुक्ल) २१ जानेवारी २०२४

षट्तिला एकादशी (पौष कृष्ण) ६ फेब्रुवारी २०२४

जया एकादशी (माघ शुक्ल) २० फेब्रुवारी २०२४

विजया एकादशी (माघ कृष्ण) स्मार्त ६ भागवत ७ मार्च २०२४

आमलकी एकादशी (फाल्गुन शुक्ल) २० मार्च २०२४

पापमोचनी एकादशी (फाल्गुन कृष्ण) ५ एप्रिल २०२४

कामदा एकादशी (चैत्र शुक्ल) १९ एप्रिल २०२४

वरुथिनी एकादशी (चैत्र कृष्ण) ४ मे २०२४

मोहिनी एकादशी (वैशाख शुक्ल) १९ मे २०२४

अपरा एकादशी (वैशाख कृष्ण) स्मार्त २ आणि भागवत ३ जून २०२४

निर्जला एकादशी (ज्येष्ठ शुक्ल) १८ जून २०२४

योगिनी एकादशी (जेष्ठ कृष्ण) २ जुलै २०२४

देवशयनी एकादशी (आषाढ शुक्ल) १७ जुलै २०२४

कामिका एकादशी (आषाढ कृष्ण) ३१ जुलै २०२४

पवित्रा एकादशी (श्रावण शुक्ल) १६ ऑगस्ट २०२४

अजा एकादशी (श्रावण कृष्ण) २९ ऑगस्ट २०२४

परिवर्तनी (भाद्रपद शुक्ल) १४ सप्टेंबर २०२४

इंदिरा एकादशी (भाद्रपद कृष्ण) २८ सप्टेंबर २०२४

पाशांकुशा (आश्विन शुक्ल) स्मार्त १३ आणि भागवत १४ ऑक्टोबर २०२४

रमा एकादशी (आश्विन कृष्ण) २८ ऑक्टोबर २०२४

प्रबोधिनी एकादशी(कार्तिक शुक्ल) १२ नोव्हेंबर २०२४

उत्पत्ति एकादशी (कार्तिक कृष्ण) २६ नोव्हेंबर २०२४

मोक्षदा एकादशी (मार्गशीर्ष शुक्ल) ११ डिसेंबर २०२४

सफाला एकादशी (मार्गशीर्ष कृष्ण) २६ डिसेंबर २०२४

Whats_app_banner