मराठी बातम्या  /  धर्म  /  Happy dasara : दसऱ्यानिमित्त मित्र, नातेवाईक आणि जवळच्या लोकांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा!

Happy dasara : दसऱ्यानिमित्त मित्र, नातेवाईक आणि जवळच्या लोकांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा!

Oct 24, 2023, 03:01 PM IST

  • Dasara Wishes in marathi 2023 : संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.

Dussehra Wishes 2023

Dasara Wishes in marathi 2023 : संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.

  • Dasara Wishes in marathi 2023 : संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.

Dussehra Wishes In Marathi: दसऱ्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. हिंदु पंचागानुसार अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दशमीला विजयादशमी अर्थात दसरा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात. नवीन वाहन किंवा सोन्याची खरेदी केली जाते. प्रत्येकजण कुटुंब, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यासह हा सण साजरा करतात. मात्र,

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

काही कारणांमुळे आज तुम्ही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नाही. अशा लोकांसाठी खालील शुभेच्छा उपयुक्त ठरणार आहेत.

मान्यतेनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला होता. दुसर्‍या मान्यतेनुसार, दुर्गामातेने ९ दिवस युद्ध केल्यानंतर महिषासुराचा वध केला. दसरा शब्दाचा अर्थ दशहरा असा होतो. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे पराभव. तसेच माता दुर्गेच्या नऊ रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला,असेही म्हटले जाते.

दसऱ्याच्या खास शुभेच्छा

 

१) आपट्याची पाने, झेंडुची फुले,

घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी,

दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

 

२) हा दसरा तुमचे सर्व दुःख आणि संकट जाळून टाकू दे.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

३) आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार

आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

 

४) भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

५) भगवान राम आणि माता दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील

तुम्हाला अफाट यश, आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!

 

६)अधर्मावर धर्माची विजय

असत्यावर सत्याची विजय

वाईटावर चांगल्याचा विजय

पापावर पुण्याचा विजय

अज्ञानावर ज्ञानाची विजय

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

७) आंब्याच्या पानांची केली कमान,

अंगणात काढली रांगोळी छान,

आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,

आपट्याची पाने देऊन करा साजरा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

 

८) जल्लोष सणाचा

जल्लोष विजयाचा,

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या