Dussehra History, Importance and Significance: हिंदू धर्मात दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्सवासाठी साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला. दुसर्या मान्यतेनुसार, दुर्गामातेने ९ दिवसांचा युद्धानंतर महिषासुराचा वध केला. दरम्यान, नवरात्रीचा इतिहास, महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.
या वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४४ वाजता सुरू होत आहे. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३.१४ वाजता संपेल. २४ ऑक्टोबर रोजी उदया तिथी येत आहे. त्यामुळे दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि १० व्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे; तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी, असे म्हटले जाते.
दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यंदा रावण दहन २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४३ वाजल्यापासून सुरु होणार आहे. विजयादशमीला शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाईल.
विजय मुहूर्त: २४ ऑक्टोबर २०२३, दुपारी ०१.५८ ते ०२.४३ पर्यंत आहे.
अभिजीत मुहूर्त: २४ ऑक्टोबर २०२३, सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२८ पर्यंत आहे.