मराठी बातम्या  /  धर्म  /  Pradosh Kaal : आर्थिक भरभराटीसाठी करा भगवान शंकराची पूजा; प्रदोष काळात करा हे व्रत

Pradosh Kaal : आर्थिक भरभराटीसाठी करा भगवान शंकराची पूजा; प्रदोष काळात करा हे व्रत

Aug 28, 2023, 09:38 AM IST

  • Shiv Shankar puja in Pradosh : भगवान शिवजी प्रसन्न झाल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होत असतात. त्यामुळं शंकराची पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

Bhagwan Shiv Shankar Puja (HT)

Shiv Shankar puja in Pradosh : भगवान शिवजी प्रसन्न झाल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होत असतात. त्यामुळं शंकराची पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

  • Shiv Shankar puja in Pradosh : भगवान शिवजी प्रसन्न झाल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होत असतात. त्यामुळं शंकराची पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

Bhagwan Shiv Shankar Puja : व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यासाठी धार्मिक विधींचं अत्यंत महत्व असतं. कुटुंबात सुख-समृद्धी आणि धनलाभासाठी अनेक लोक भगवान शंकराची पूजा करत असतात. सध्याच्या काळात लोक सुख समृद्धीसह देवाला धनलाभासाठी साकडं घालत आहे. प्रदोषकाळात शंकराची पूजाअर्चना केल्यास त्याचा आयुष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण रावणाकडे जितकी संपत्ती होती, त्याला शंकराचाच आशिर्वाद होता. रावण प्रदोषकाळात पूजा करून शंकराला प्रसन्न करून घेत होता. त्यामुळं रावणाकडे नेहमीच लक्ष्मीचा वास राहिलेला होता. त्यामुळं तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनलाभाची गरज असेल तर तुम्ही देखील शंकराची पूजा करायला हवी.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

प्रदोषकाळात घरातील महिला, मुलं किंवा पुरुष भगवान शंकराची पूजा करू शकतात. तसेच या काळात उपवास ठेवून देवाची आराधना करणं हा देखील धनप्राप्तीसाठी सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. याबाबतची सर्व माहिती धर्मशास्त्रात देण्यात आली आहे. प्रदोषकाळात भगवान शंकराची पूजा केल्यास आयुष्यातील आर्थिक अडचणी आणि अन्य समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय दररोज संध्याकाळी शंकराची पूजा केल्यानंतरच जेवण करायला हवं. प्रदोषकाळात शिव तांडव स्तोत्रचं पठण केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता असते. प्रदोषकाळात किंवा त्रयोदशीला शंकराची पूजा केल्यामुळं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असतात. त्रयोदशीला महिलांनी उपवास केल्यास त्यामुळं त्यांच्या जोडीदारांचं आयुष्य वाढतं. तसेच नात्यात गोडवा निर्माण होत असतो.

प्रदोषकाळात भगवान शंकर हा भक्तांवर प्रसन्न होण्यास तयार असतो. याच काळात रावणाने शंकराची पूजा करत त्याला प्रसन्न केलं होतं. त्यामुळं तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण जाणवत असेल तर या काळात भगवान शंकराची पूजाअर्चना करायला हवी. कारण भगवान शंकर प्रसन्न झाल्यास तो कधीही त्याच्या भक्तांना एकटं सोडत नाही. कुटुंब, घर, नोकरी आणि व्यापार अशा सर्व क्षेत्रांमध्ये भगवान शंकर हा भक्तांना सुख आणि समृद्धी बहाल करत असतो. प्रदोषकाळात संध्याकाळी जेवणापूर्वी शंकराची पूजा करण्याची वेळ ही सर्वात योग्य मानली जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याच्याशी सहमत असेलच असे नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या