मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : नोकरीवाल्याशी लग्न केलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरा बेरोजगार; नववधूसोबत धक्कादायक प्रकार

Viral News : नोकरीवाल्याशी लग्न केलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरा बेरोजगार; नववधूसोबत धक्कादायक प्रकार

Mar 13, 2023, 04:41 PM IST

    • Viral News : सरकारी नोकरीवाला जावई मिळाल्यामुळं तरुणीच्या वडिलांनी मोठ्या धुमधडक्यात लग्न लावलं होतं.
West Bengal Viral News (HT)

Viral News : सरकारी नोकरीवाला जावई मिळाल्यामुळं तरुणीच्या वडिलांनी मोठ्या धुमधडक्यात लग्न लावलं होतं.

    • Viral News : सरकारी नोकरीवाला जावई मिळाल्यामुळं तरुणीच्या वडिलांनी मोठ्या धुमधडक्यात लग्न लावलं होतं.

West Bengal Viral News : सध्याच्या काळात अनेक लोकांना सरकारी नोकरीवाला जावई हवा असतो. याशिवाय लग्नासाठी मुलींचीही चॉईस बदलत असल्यामुळं सुशिक्षित तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालेलं आहे. सरकारी नोकरीवाला नवरा मिळाला तर मुलीकडील लोक मोठ्या धुमडाक्यात लग्न लावून देत असतात. परंतु लग्नाच्या २४ तासांच्या आतच तरुणाची सरकारी नोकरी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात ही घटना घडली असून या घटनेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याशिवाय सरकारी नोकरीवाला जावई मिळाला म्हणून उत्सव साजरा करणाऱ्या पाहुणेमंडळीच्या आनंदावर मोठं विरजण पडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या प्रणब रॉय या तरुणाचं एका तरुणीसोबत लग्न जुळलं होतं. दोन्ही परिवारांचं मनोमिलन झाल्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात मंगल कार्यालयात लग्नसोहळा पार पडला. प्रणबने मुलीला नवरी म्हणून घरी आणलं परंतु त्याच्यासाठी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पोटात गोळा आणणारी बातमी समोर आली. जलपाईगुडी जिल्ह्यातील जिल्हा कोर्टानं ८४२ शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा निकाल देत त्यांना सेवेतून तात्काळ नारळ देण्याचे निर्देश दिले. त्यात प्रणबचंही नाव असल्यामुळं त्याच्या कुटुंबियांसहित नवरीच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.

त्यानंतर अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसल्यानंतर त्यांनी प्रणबचं सांत्वन करण्यासाठी त्याची भेट घेतली आहे. सरकारी नोकरी गेल्यानंतर प्रणबच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. नव्या नवऱ्याची सरकारी नोकरी गेल्यानंतर त्यावर अनेक लोकांनी कमेंट्स करत प्रणबची खिल्ली उडवली आहे. तर काही लोकांनी त्याला भावनिक साथ देत त्याचं सांत्वन केलं आहे. या प्रकरणावर अद्याप दोन्हीकडच्या कुटुंबियांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं आता या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

पुढील बातम्या