मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक पूर; ७ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक बेपत्ता

दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक पूर; ७ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक बेपत्ता

Oct 06, 2022, 10:21 AM IST

    • West Bengal Durga Visarjan: नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. लोकांना काही लक्षात येण्याआधीच नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि लोक वाहून गेले.
दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आला पूर

West Bengal Durga Visarjan: नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. लोकांना काही लक्षात येण्याआधीच नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि लोक वाहून गेले.

    • West Bengal Durga Visarjan: नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. लोकांना काही लक्षात येण्याआधीच नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि लोक वाहून गेले.

West Bengal Durga Visarjan: पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी इथं माल नदीला अचानक पूर आला. तेव्हा विसर्जनासाठी गेलेल्यांपैकी काहीजण वाहून गेले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप काही लोक बेपत्ता आहेत. तसंच अनेकजण नदीत अडकले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

जलपायगुडीचे एसपी देवर्षी दत्ता यांनी विसर्जनावेळी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ७ मृतदेह सापडले आहेत. तर १० जण जखमी आहेत. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ३० ते ४० लोक बेपत्ता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

माल नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं प्रवाहाचा वेग वाढला. त्यावेळी विसर्जनासाठी नदीच्या पाण्यात गेलेले काही लोक वाहून गेले. या घटनेनंतर मोठा गोंधळ झाला, घटनास्थळी लोकांची आरडाओरड सुरू होती. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळतात विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून बचावकार्य राबवण्यास सुरुवात करण्यात आली.

जलपायगुडीमध्ये विजयादशमी उत्सव साजरा कऱण्यात येत होता. त्यानंतर दुर्गा विसर्जनासाठी माल नदीवर सर्वजण जात होते. विधिवत पूजेनंतर दुर्गामूर्ती नदीत नेत होते. यावेळी अनेकांनी नदीच्या मध्यभागी उभा राहून देवीला अखेरचा निरोप दिला. दरम्यान, त्याचवेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. लोकांना काही लक्षात येण्याआधीच नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि लोक वाहून गेले. यावेळी नदीकिनारी असलेल्या लोकांच्या डोळ्यादेखत अनेकजण वाहून जात होते, मात्र त्यांना काहीच करता आलं नाही.

विभाग

पुढील बातम्या