मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Upsc Prelims Exam : ‘या’ कारणामुळे २६ मे रोजी होणारी UPSC पूर्व परीक्षा स्थगित, नवी तारीख केली जाहीर

Upsc Prelims Exam : ‘या’ कारणामुळे २६ मे रोजी होणारी UPSC पूर्व परीक्षा स्थगित, नवी तारीख केली जाहीर

Mar 19, 2024, 08:54 PM IST

  • UPSC Exam Postponed : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC)  आयोजित केली जाणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

यूपीएससीच्या परीक्षा स्थगित

UPSC Exam Postponed : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून(UPSC) आयोजित केली जाणारीनागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

  • UPSC Exam Postponed : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC)  आयोजित केली जाणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

UPSC Prelims Postponed: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) आयोजित केली जाणारी नागरी सेवा परीक्षा (CSE) ची प्रीलिम्स आणि इंडियन फॉरेस्ट सर्विसची प्रीलिम्स परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षा २६ मे २०२४ रोजी होणार होत्या. यूपीएससीने अधिकृत नोटीस जारी करत याची माहिती दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या नोटिसीत म्हटले आहे की, देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आयोगाने सिविल सर्विस (प्रीलिम्स) परीक्षा आणि इंडियन फॉरेस्ट सर्विसची प्रीलिम्स २०२४ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आयोजन २६ मे २०२४ रोजी करण्यात आले होते. आता या पूर्व परीक्षा १६ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत.

यूपीएससी सिविल सर्विस प्रीलिम्स परीक्षा २६ मे २०२४ ची तारीख लोकभा निवडणुकीच्या कार्यक्रमास क्लॅश होत होती. यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिल तर अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. यूपीएससीच्या आधी ICAI ने CA फायनल आणि इंटरच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. 

यूपीएससी सिविल सर्विस परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी असल्याचे मानले जाते. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनण्यासाठी देशभरातून दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात. यावर्षी यूपीएससी परीक्षेची जाहिरात १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. 

यूपीएससी सीएसई परीक्षा २०२४ नुसार पूर्व परीक्षा देशभरातील ८० केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून १०५६ रिक्त पदे भरली जातील. त्यातील ४० पदे दिव्यांगांसाठी राखीव आहेत.

CUET UG परीक्षाही होणार स्थगित?

कॉमन यूनिवर्सिटी इन्ट्रास टेस्ट फॉर अंडर ग्रॅज्युएट (CUET UG)  २०२४ ची संभाव्य परीक्षा तारीख १५ मे ते ३१ मे दरम्यान आहे. या तारखाही लोकसभा निवडणुकांदरम्यान येत असल्याने या परीक्षागी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र या परीक्षा स्थगित केल्याची अधिकृत सूचना अजूनपर्यंत आलेली नाही.

विभाग

पुढील बातम्या