मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pet Animal : आता पाळीव कुत्रे आणि मांजरांना रेल्वेतून नेणे होणार शक्य, ऑनलाईन बुक करता येणार तिकीट

Pet Animal : आता पाळीव कुत्रे आणि मांजरांना रेल्वेतून नेणे होणार शक्य, ऑनलाईन बुक करता येणार तिकीट

May 02, 2023, 08:23 AM IST

    • Pet Animal travhal in Train : पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेता यावे यासाठी रेल्वेने एक खास प्रस्ताव तयार केला आहे.
Pet Animal travhal in Train

Pet Animal travhal in Train : पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेता यावे यासाठी रेल्वेने एक खास प्रस्ताव तयार केला आहे.

    • Pet Animal travhal in Train : पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेता यावे यासाठी रेल्वेने एक खास प्रस्ताव तयार केला आहे.

दिल्ली : रेल्वेच्या एसी वर्ग १ च्या डब्यातून पाळीव प्राण्यांना नेता यावे यासाठी रेल्वेमंत्रालय एक खास प्रस्ताव तयार करत आहे. यामुळे पाळीव कुत्रे आणि मांजरींना रेल्वेतून नेता यावे यासाठी ऑनलाइन तिकीट विक्रीची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. त्यामुळे येथून पुढे प्रवाशांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेणे सुलभ होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

Cyclone Mocha: 'मोचा' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकणार; बंगालच्या उपसागरात वादळाचे केंद्र

रेल्वेतून पाळीव प्राण्यांना नेणे हे एक दिव्य काम होते. प्रवाशांना या साठी परवानग्या आणि तिकीट काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पूर्वी पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यासाठी प्लैटफॉर्मवरील पार्सल काऊंटरवर तिकीट काढावी लागत होती. त्यामुळे हे तिकीट काढणे डोकेदुखीचे काम होते. मात्र, आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकिट सुविधा सुरू करण्याच्या विचारात रेल्वे प्रशासन आहे.

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढणार; पुढच्या २४ तासांत राज्यात गारपीटीचा इशारा

या बाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाने सॉफ्टवेअरमध्ये कोणाला बदल करावेत, असे विचारले आहे, जेणेकरून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर प्राण्यांचे ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा सुरू करता येईल. कुत्रा-मांजर तिकीट बुकिंगचे अधिकार टीटीईला देण्याचा विचार सुरू असल्याचे देखील रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे झाल्यास पार्सल काऊंटरवर जाण्याचा प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. घरबसल्या ऑनलाइन तिकीट काढून पाळीव प्राण्यांना रेल्वेतून घेऊन जाणे सोपे होणार आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अमलबाजवणीची प्रतीक्षा आता प्रवाशांना आहे.

विभाग

पुढील बातम्या