मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : मोठी बातमी! अवघा एक शब्द उच्चारत सुरत कोर्टानं राहुल गांधी यांची शिक्षा स्थगितीची मागणी फेटाळली

Rahul Gandhi : मोठी बातमी! अवघा एक शब्द उच्चारत सुरत कोर्टानं राहुल गांधी यांची शिक्षा स्थगितीची मागणी फेटाळली

Apr 20, 2023, 11:46 AM IST

  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. मोदी आडनावाच्या बदनामीच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. मोदी आडनावाच्या बदनामीच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. मोदी आडनावाच्या बदनामीच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

Surat Court on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल यांची मागणी सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायमूर्तींनी कोर्टात प्रवेश करताच 'डिसमिस' असा एकच शब्द उच्चारला. त्यामुळं शिक्षेला स्थगिती मिळवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न फसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सगळे मोदी चोर कसे असं म्हणत राहुल यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला होता. राहुल यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत गुजरातमधील भाजपचे पदाधिकारी पूर्णेश मोदी यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेचा आधार घेत लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी रद्द केली.

Rahul Gandhi: देशाची सर्व संपत्ती एकाच माणसाला का देताय?; अदानींच्या प्रगतीचा आलेख दाखवत राहुल गांधींचा मोदींना सवाल

या निर्णयास राहुल गांधी यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं व शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ट्रायल कोर्टानं सुनावलेली शिक्षा खूपच कठोर आहे, असं राहुल यांनी अर्जात म्हटलं होतं. त्यावर सुनावणी झाल्यानंतर मागील गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरपी मोगेरा यांनी २० एप्रिलपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय जाहीर करताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळली. राहुल गांधी व काँग्रेससाठीही हा धक्का मानला जात आहे. सुरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार, याबद्दल उत्सुकता आहे.

विभाग

पुढील बातम्या