मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Qatar News : भारताच्या कूटनीतीला यश; कतारनं केली नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची सुटका

Qatar News : भारताच्या कूटनीतीला यश; कतारनं केली नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची सुटका

Feb 12, 2024, 10:07 AM IST

  • Indian Ex Navy Officers Released from qatar : कतारने शिक्षा दिलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना भारतात परत सोडण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी भरतात परत आले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या कोर्टाने ८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Indian Ex Navy Officers Released

Indian Ex Navy Officers Released from qatar : कतारने शिक्षा दिलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना भारतात परत सोडण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी भरतात परत आले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या कोर्टाने ८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

  • Indian Ex Navy Officers Released from qatar : कतारने शिक्षा दिलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना भारतात परत सोडण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी भरतात परत आले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या कोर्टाने ८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Indian Ex Navy Officers Released from qatar : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नौदलाचे आठ माजी कर्मचारी कतारहून भारतात परतले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या न्यायालयाने अल दाहरा ग्लोबल प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु, यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने केलेल्या मुसद्देगिरीमुळे सर्व जणांची शिक्षा कमी करण्यात आली असून त्यांना पुन्हा परत भारतात सोडण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pune crime news : नखाचं लॉकेट बनवण्यासाठी थेट बिबट्याचा पंजा कापला; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले, 'कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या ८ भारतीय नागरिकांची सुटका केल्याने भारत सरकार कतारच्या या निर्णयाचे स्वागत करते. ८ पैकी ७ भारतात परतले आहेत.

कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या ८ भारतीयांत कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णांदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे. यापूर्वी कतार न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने दाखल केलेले अपील मान्य केले होते.

Maharashtra weather update : राज्यात आज देखील अवकाळी पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

काय होते प्रकरण

अल दहराह कृत्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. या माजी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना २६ ऑक्टोबर २०२३ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी भारताने हा धक्कादायक आणि एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींचा शोध घेऊन न्यायालयीन लढा देण्यात आला होता.

पीएम मोदींचीही भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई येथे आयोजित COP28 शिखर परिषदेत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय भागीदारी आणि कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या हितासंदर्भात चर्चा देखील करण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या