Maharashtra weather update : राज्यात सलग दुसऱ्या दिवसही विदर्भाला पावसाने झोडपले. विदर्भात काही जिल्ह्यात काल गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आज देखील विदर्भात आणि मराठवाड्यात बीड वगळता तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषतः अमरावती नागपूर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. या पावसाचा फटका तूर, कापूस, सोयाबीन या पिकांना झाला. आज देखील विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह वीजांचा गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकापासून पश्चिम विदर्भापर्यंत उत्तर कर्नाटक व मराठवाड्यातून जात आहे. तसेच प्रती चक्रीय वारे म्हणजेच अँटी सायक्लोनिक विंड फ्लो मुळे साऊथ ईस्टर्ली किंवा साउथ साउथ ईस्टर्ली वारे बंगालच्या उपसागरावरून आर्द्रता घेऊन पेनिंगसोलर इंडिया वरून जात आहेत. मध्य भारतातून सुद्धा वारे वाहत आहे. या वाऱ्यांची परस्पर क्रिया विदर्भ पूर्व मध्य प्रदेश व दक्षिण छत्तीसगड वर होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात आज बीड जिल्हा वगळता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषतः अमरावती नागपूर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. उत्तर मध्य महाराष्ट्रात तसेच पुण्यात आकाश वेळोवेळी निरभ्र असल्यामुळे व उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात वेळोवेळी किरकोळ घट होईल.
पुणे आणि परिसरात पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता नाही. पुढील ४८ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील १३ फेब्रुवारी नंतर किमान तापमानात किरकोळ घट म्हणजे अंदाजे दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
याचा अधिक परिणाम पूर्व विदर्भावर होऊ शकतो, असा अंदाज आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहील. तर, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. मात्र, पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
मराठवाड्यातील नांदेड जिल्हयातील काही तालुक्यात रविवारी सायंकाळी आणि रात्री आवकाळी पावसाने हजेरी लावली. सोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान खात्याने ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार, असा अंदाज वर्तविला होता. दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर, किनवट, आणि भोकर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि ज्वारी पिकाचे नुकसान झाले.