Pune crime news : नखाचं लॉकेट बनवण्यासाठी थेट बिबट्याचा पंजा कापला; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime news : नखाचं लॉकेट बनवण्यासाठी थेट बिबट्याचा पंजा कापला; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

Pune crime news : नखाचं लॉकेट बनवण्यासाठी थेट बिबट्याचा पंजा कापला; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

Published Feb 12, 2024 07:06 AM IST

Pune crime news : वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

Pune crime news
Pune crime news

Pune crime news : पुण्याच्या वेशीवर आता बिबट्या येऊन ठेपला आहे. यामुळे मानव आणि बिबट्या संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच पुण्यात रविवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे वडगाव येथे बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापून नेल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलांनी बिबट्याच्या पायाची नखे देखील तोडली आहेत.

Pune Murder : घटस्फोटाला जबाबदार असल्याच्या संशयातून जन्मदात्या आईचा कोयत्याने गळा कापून मुलानं केला खून

वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे नवनाथ खांदवे यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. या ठिकाणी मादी बिबट ही मृत अवस्थेत आढळली. या मादी बिबट्याचे वय अंदाजे १० महिने होते. दरम्यान, वणविभाने तपासणी केली असता, ३ नखे आणि एक पंजा कापून नेल्या असल्याचे दिसले. या मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन ९ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करण्यात आले. बिबत्याचा मृत्यू हा कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचा पंजा आणि नखे कापून नेलयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून वन कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला.

Vallabh Benke: जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन

ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपी कडून ४ बिबट नखे १ पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि २ बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वात सहा.वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर