मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Narendra Modi : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले...

PM Narendra Modi : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले...

Jan 29, 2023, 01:58 PM IST

  • Narendra Modi on BBC documentary : गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वादंग पेटलेलं असतानाच आता पीएम मोदींनी त्यावर प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे.

Prime Minister Narendra Modi On BBC Documentary (ANI)

Narendra Modi on BBC documentary : गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वादंग पेटलेलं असतानाच आता पीएम मोदींनी त्यावर प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे.

  • Narendra Modi on BBC documentary : गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वादंग पेटलेलं असतानाच आता पीएम मोदींनी त्यावर प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे.

Prime Minister Narendra Modi On BBC Documentary : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं गुजरात दंगलीवर आणि अल्पसंख्यांकाविरोधातील हिंसाचारावर आधारित एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केल्यामुळं राजकीय वादंग पेटलं आहे. केंद्रातील मोदी सरकारनं बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली असून बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून प्रपोगंडा राबवत असल्याचा आरोप सरकारनं केला आहे. त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठांसह महाराष्ट्रातील एफटीआय आणि टिसमध्ये या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनींगवरून उजव्या व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या ट्रुफसमोर बोलताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असून फूट पाडणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक लोक भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एकता हीच भारताची ताकद असल्यामुळं त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीबीसीचं नाव न घेता जोरदार टोला हाणला आहे.

बीसीसीच्या पहिल्या भागातील माहितीपटात गुजरात दंगलीवेळी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तर दुसऱ्या भागात २०१४ नंतर देशातील अनेक शहरांमधील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यानंतर बीबीसीची डॉक्युमेंट्री हा प्रपोगंडा असल्याचा आरोप करत केंद्र सरकारनं त्याच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

पुढील बातम्या