मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mughal Garden Delhi : मुघल गार्डनच्या नामांतरावरून मोदी सरकार टीकेच्या रडारवर; पाहा कोण काय म्हणाले?

Mughal Garden Delhi : मुघल गार्डनच्या नामांतरावरून मोदी सरकार टीकेच्या रडारवर; पाहा कोण काय म्हणाले?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 11:37 AM IST

Mughal Garden Name Change : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत उद्यान असं करण्यात आलं आहे. त्यानंतर आता विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Mughal Garden Rashtrapati Bhavan Name Change
Mughal Garden Rashtrapati Bhavan Name Change (HT)

Mughal Garden Rashtrapati Bhavan Name Change : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील औरंगजेब रोडचं नामांतर केल्यानंतर आता राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत उद्यान असं करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक दिल्लीत येत असतात. पर्यटनदृष्ट्या मुघल गार्डनला महत्त्व असलं तरी त्याला राजकीयदृष्ट्यादेखील मोठं महत्त्व आहे. १९१७ इंग्रज अधिकारी सर एटविन लुटियन्स दिल्लीत मुघल पद्धतीचं गार्डन बांधल्यानंतर त्याला इंग्रजांनी मुघल गार्डन असं नाव दिलं होतं. परंतु आता केंद्रातील मोदी सरकारनं मुघल गार्डनच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

मुघल गार्डनच्या नामांतराचा कॉंग्रेसनं मोठा विरोध केला असून पक्षाच्या अनेक नेत्यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. शहरं आणि रस्त्यांची नावं बदलणं ही सरकारची सवय आहे. परंतु आता गार्डन्सचीही नावं बदलण्यात येत आहे. सरकारनं आधी एखादं गार्डन तयार करावं आणि त्यानंतर त्याचं नामांतर करावं, मोदी सरकार प्रत्येक गोष्टीत नामांतराची प्रथा पाडत असून जेव्हा नवं सरकार येईल, तेही तेच करेल, असं म्हणत कॉंग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारनं हिंदुंना खूश करण्यासाठी मुघल गार्डनचं नामांतर केलं असून जर असंच सुरू राहिलं तर नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधी घोषित केलं जाऊ शकतं आणि लोकं मोदींना राष्ट्रपिता मानायला लागतील, अशा शब्दांत इस्लामिक स्कॉलर साजिद रशीदी यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे.

नामांतर नाही तर आर्थिक प्रश्नांतर लक्ष द्या- तृणमूल

मुघल गार्डनचं नाव अमृत गार्डन असं करण्यात आल्यानंतर आता त्याला मोदी गार्डन असंही म्हटलं जाऊ शकतं. परंतु सरकारला रोजगार, महागाई आणि सध्याच्या आर्थिक संकटावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं म्हणत तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी मुघल गार्डनच्या नामांतरावर टीका केली आहे. मुघल गार्डनचं नाव बदलल्यामुळं बेरोजगारी कमी होणार नाहीये. महागाई कमी होणार नाही. शहरं, रस्ते आणि गार्डन्सचं नामांतर करणं हाच केंद्रातील मोदी सरकारचा विकास असल्याचं सांगत एमआयएमनं सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात एकूण पाच उद्यानं आहेत. त्यातल्या मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत गार्डन असं करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज गार्डनच्या नव्या नावाचं अनावरण करणार आहेत. १५ एकर परिसरात पसरलेल्या मुघल उद्यानात १३८ प्रकारचे फूल, १० हजारांहून अधिक ट्यूलिप, पाच हजार हंगामी फूलं आहेत. त्यामुळं वसंत ऋतुत या गार्डनला भेट देणं ही अनेकांचा पर्वणीच असते. सन १९१७ साली इंग्रज अधिकारी सर एटविन लुटियन्स यांनी मुघल गार्डन तयार केलं होतं.

IPL_Entry_Point