मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Mandir Inauguration: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

Ram Mandir Inauguration: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

Jan 13, 2024, 07:20 AM IST

    • President Droupadi Murmu got invitation of Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
President Droupadi Murmu got invitation of Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony

President Droupadi Murmu got invitation of Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

    • President Droupadi Murmu got invitation of Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Ram Mandir: अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील शुक्रवारी (दि १२) निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांना हे निमंत्रण राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल यांनी त्यांच्या निवस्थानी जाऊन दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Maharashtra weather update: पुढील दोन दिवस थंडीचे! सोमवारनंतर होणार तापमानात वाढ; असा आहे हवामानाचा अंदाज

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पत्र १२ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द करण्यात आले, असे विहिंपने म्हटले आहे. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आणि अयोध्येला भेट देण्याची वेळ लवकरच ठरवणार असल्याचे सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रण

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांना आलोक कुमार आणि नृपेंद्र मिश्रा यांनी निमंत्रण दिले. यावेळी धनखड म्हणाले, "मी माझ्या तीन पिढ्यांसह अयोध्या धामला नक्की येईन. निमंत्रण मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या हस्ते हे निमंत्रण देण्यात आले. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशभरातील हजारो संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अगोदर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) चे स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते देशभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विविध शहरातील मंदिरांमध्ये प्रार्थना करून त्यांना अभिषेक सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

Ram Mandir : “अयोध्येत राम मंदिर होणार हे तर नियतीने…”, मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच लालकृष्ण आडवाणींचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून या सोहळ्यासाठी ते अयोध्येला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रित दिले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

पुढील बातम्या