Maharashtra weather update: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रिय स्थितीमुळे राज्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, सध्या राज्यावर कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. यामुळे राज्यात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहून वातावरण कोरडे राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे १५ जानेवारी पर्यंत थंडी वाढणार असून त्यानंतर तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होणार आहे. यानंतर मात्र, तापमानात वाढ होणार आहे. दरम्यान, उत्तर भरातात थंडीची लाट कायम आहे.
राज्यावरील पावसाचे ढग हे सध्या दूर झाले आहे. सध्या राज्यावर कोणतहीही हवामान यंत्रणा नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असून आकाशही निरभ्र राहणार आहे. पहाटे तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे १५ जानेवारी पर्यंत किमान तापमानात हळूहळू अंदाजे तीन ते चार डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. तर आभाळ मुख्यतः निरभ्र राहणार असल्यामुळे कमाल कमाल तापमान चार डिग्रीने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
पुणे आणि परिसरात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील ४८ तासात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस म्हणजेच १५ जानेवारी पर्यंत किमान तापमान तीन ते चार डिग्रीने घट होईल तर कमाल तापमानात चार डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतही किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे.
मध्यप्रदेशकडून येणारे वारे थंड आहेत. त्यामुळे विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. विदर्भावर देखील हवामानाची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरणात कोणताही मोठा बदल होणार नाही. पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा बसल जाणवणार नाही.