मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा राडा, प्रवाशांकडून क्रू मेंबर्सला बेदम मारहाण; आरोपीला अटक

Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा राडा, प्रवाशांकडून क्रू मेंबर्सला बेदम मारहाण; आरोपीला अटक

Apr 10, 2023, 02:49 PM IST

    • Air India Flight : दिल्लीहून लंडनला निघालेल्या विमानात एका प्रवाशानं क्रू मेंबर्सला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Air India Flight Crime News (HT)

Air India Flight : दिल्लीहून लंडनला निघालेल्या विमानात एका प्रवाशानं क्रू मेंबर्सला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Air India Flight : दिल्लीहून लंडनला निघालेल्या विमानात एका प्रवाशानं क्रू मेंबर्सला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Air India Flight Crime News : दिल्लीहून लंडनसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवाशानं किरकोळ वादातून थेट क्रू मेबर्सला बेदम मारहाण केली असून त्यामुळं पायलटने विमानाचं दिल्ली विमानतळावर तातडीनं लँडिंग केलं आहे. त्यानंतर आता आरोपी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. एअर इंडिया कंपनीनं या प्रकरणात एक पत्रक जारी करत घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं महिलेच्या अंगावर मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता विमानातील कर्मचाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं एआय-१११ हे विमान दिल्लीहून लंडनसाठी निघालं होतं. विमानात २५५ प्रवासी बसलेले होते. यावेळी विमानातील एका प्रवाशानं क्रू मेबर्सशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. आरोपी प्रवाशाच्या मारहाणीत दोन कर्मचाऱ्यांना मार लागला असून विमान दिल्ली विमानतळावर लँड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाला बेड्या ठोकल्याचं एअर इंडियानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी निघालेल्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर मूत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलं होतं. त्यानंतर आता दिल्लीहून लंडनला निघालेल्या विमानात आरोपी प्रवाशानं थेट क्रू मेंबर्सला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आल्यामुळं दिल्लीत खळबळ उडाली आहे.

पुढील बातम्या