मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wheat Price Increase : गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

Wheat Price Increase : गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

Sep 15, 2023, 01:29 PM IST

    • Wheat Price Hike : अन्नधान्याची साठवणूक रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळं आता सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Wheat Price Hike In India (HT)

Wheat Price Hike : अन्नधान्याची साठवणूक रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळं आता सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    • Wheat Price Hike : अन्नधान्याची साठवणूक रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळं आता सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Wheat Price Hike In India : देशातील विविध राज्यांमधील हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असल्याचं चित्र आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील बाजारपेठांमध्ये गव्हाचे दर वाढत आहे. त्यामुळं महागाईनं आधीच त्रस्त असलेल्या सामान्यांना मोठा झटका बसला आहे. परंतु मान्सून संपत असताना आणि लोकसभा निवडणूक जवळ येत असताना वाढत असलेल्या अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहे. देशातील अन्नधान्याचा आणि विशेषत: गव्हाचा साठा नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

बाजारपेठांमध्ये गव्हाची साठवणूक क्षमता तीन हजार टनांहून दोन हजार टनांपर्यंत करण्यात आली आहे. गव्हाची विक्री करणारे व्यापारी, होलसेल व्यापारी आणि कृषी संस्थांना हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय खाद्य सचिव संजिव चोप्रा यांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहे. याशिवाय गव्हाच्या किंमती स्थिर करण्यासाठी गरज भासल्यास आणखी मोठे निर्णय घेण्यात येणार असल्याचंही संजीव चोप्रा यांनी म्हटलं आहे. व्यापाऱ्यांना तीन हजार टनांपर्यंत गव्हाची साठवणूक करता येते, परंतु सरकारच्या नव्या निर्णयामुळं व्यापाऱ्यांना केवळ दोन हजार टनांची साठवणूक करता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात गव्हाच्या किंमती चार टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातही गव्हाच्या किंमती सतत वाढत आहे. परिणामी प्रतिक्विंटल गव्हाचा दर २५५० रुपयांवर पोहचला आहे. देशात गव्हासह इतर अन्नधान्याचा आवश्यक साठा आहे. परंतु काही घटक बाजारातील अन्नधान्यांची साठवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं संजीव चोप्रा यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर केंद्राकडून कारवाईची पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातम्या