मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathwada Cabinet Meeting : औरंगाबादमध्ये उद्या वाहतुकीतील बदल; हे रस्ते राहणार बंद

Marathwada Cabinet Meeting : औरंगाबादमध्ये उद्या वाहतुकीतील बदल; हे रस्ते राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 15, 2023 12:04 PM IST

Marathwada Cabinet Meeting : औरंगाबाद येथे उद्या मंत्री मंडळाची बैठक हॉट आहे. यामुळे उद्या अनेक संघटना मोर्चे काढणार आहे. त्यामुळे उद्या औरंगाबाद शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे.

Traffice Updates
Traffice Updates (HT)

औरंगाबाद : औरंगाबाद येथे उद्या (दि १६) शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या दौऱ्यासह मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते उद्या बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, उद्या सरकार विरोधात विविध संघटना मोर्चे आणि आंदोलने करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उद्या शहरात वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे. अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणते रस्ते बंद आणि कोणते रस्ते सुरू राहणार आहे, याची माहिती घेऊन औरंगाबादकरांना घराबाहेर पडावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Aditya L1: आदित्यचे पाऊल पडती पुढे! चौथ्यांदा प्रदक्षिणा केली पूर्ण, लवकरच सूर्याच्या दिशेने करणार मार्गक्रमण

मंत्रिमंडळाच्या या बैठीकीत विविध घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घोषणांच्या पावसात औरंगाबादकरांना काय मिळेल या कडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. येथील प्राणी प्रश हा काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. त्यामुळे शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मिळणार का? याकडे देखील लक्ष लागले आहेत.

Ajit Pawar In Pune : विनाकारण ट्रोल केलं जातंय, आमच्या नावाने पावत्या फाडू नका; अजित पवार विरोधकांवर संतापले

हे रस्ते राहतील बंद :

-सकाळी ७ ते १० पर्यंत शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक रस्ता बंद

-सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यत भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता पूर्णपणे बंद राहील.

-सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत गोपाळ टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक रस्ता बंद रहाणारक्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्व, पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद.

-सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला

-बाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेट रस्ता बंद.

असा असणार वाहनांसाठी पर्यायी मार्ग:

-संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून शंभूनगर, गादिया विहार ते शिवाजीनगरमार्गे वाहने जातील, येतील.

-शिवाजीनगर, बारावी योजना मार्ग, गोकूळ स्वीट, जयभवानी चौकमार्गे पुढे जातील व येतील.

- अण्णा भाऊ साठे चौक, टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल नाका, सेव्हन हिल्स, क्रांती चौक उड्डाणपुलावरून महावीर चौक, मिल कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.

- राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मिल कॉर्नरहून यूटर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टीमार्गे पुढे जातील व येतील.

- गोपाळ टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील. गोपाळ टी, कोकणवाडी, क्रांतीनगरमार्गे पुढे जातील व येतील. प्रोझोन मॉल, एन-१ चौक, वोक्हार्टमार्गे येतील व जातील.

WhatsApp channel