मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat Train : मोदींच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; हल्लेखोरांचा शोध सुरू

Vande Bharat Train : मोदींच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; हल्लेखोरांचा शोध सुरू

Aug 07, 2023, 12:39 PM IST

    • Stone Pelting On Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात आरोपींकडून ट्रेनवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
Stone Pelting On Vande Bharat Train (PTI)

Stone Pelting On Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात आरोपींकडून ट्रेनवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

    • Stone Pelting On Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात आरोपींकडून ट्रेनवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

Stone Pelting On Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्थानकांच्या सुशोभिकरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञात आरोपींकडून तुफान दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत वंदे भारत ट्रेनच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे. ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याच्या या धक्कादायक घटनेमुळं उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा, हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाराबंकीत रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. त्यात पीएम मोदी ऑनलाईन सामील झाले होते. कार्यक्रम सुरू असताना बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपींकडून जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत रेल्वेच्या दरवाजांसह खिडक्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आरोपींच्या हल्ल्यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सफेदाबाद रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक होत असताना पायलटने ट्रेन न थांबवता लखनौला पोहचवली. त्यानंतर आता भारतीय रेल्वेकडून या धक्कादायक प्रकरणाची दखल घेण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या एस्कॉर्ट टीमने या घटनेची माहिती दिली असून त्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परंतु पोलिसांना कोणतेही साक्षीदार अथवा पुरावे घटनास्थळी आढळून आलेले नाहीत. त्यामुळं पोलिसांनी अज्ञात आरोपींवर सरकारी संपत्तीचं नुकसान करणे आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातम्या