rahul gandhi news today : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतमधील कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
(HT_PRINT)राहुल गांधींना खासदारकी मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
(Pappi Sharma)काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे पोस्टर झळकावण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना बाहुबली दाखवण्यात आलं आहे. त्यावर ‘भारताचे बाहुबली, राहुल गांधी’, असा उल्लेख करण्यात आला आहे.
(PTI)पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे आणि राहुल गांधींचा फोटो झळकावत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
(PTI)