मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Maldives : लक्षद्वीपवरून मालदीवमध्ये वादाच्या लाटा.. मोदींसाठी आपल्याच देशाच्या मंत्र्यांशी भिडले माजी राष्ट्रपती

Maldives : लक्षद्वीपवरून मालदीवमध्ये वादाच्या लाटा.. मोदींसाठी आपल्याच देशाच्या मंत्र्यांशी भिडले माजी राष्ट्रपती

Jan 07, 2024, 06:56 PM IST

  • Maldives India News : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यावर मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

modi and Maldives ex president Mohamed nasheed

Maldives India News : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यावर मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • Maldives India News : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यावर मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या एका मंत्र्यांच्या सोशल मीडियावर पोस्टवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये मालदीवचे मंत्री मरियम शिउना  यांनी  पंतप्रधान मोदींविरुद्ध आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. यावर मोहम्मद नशीद यांनी आक्षेप नोंदवत एक पोस्टच्या माध्यमातून या मंत्र्याची भाषा भयावह असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित


मोहम्मद नशीद यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउना यांनी आमच्या सहयोगी देशाच्या नेत्याविरुद्ध भयावह भाषेचा वापर केला आहे. हा देश मालदीवची समृद्धी आणि सुरक्षेसाठी खूपच महत्वपूर्ण आहे. राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जु यांच्या सरकारला अशा विधानांपासून स्वत:ला परावृत्त ठेवले पाहिजे. त्याचबरोबर भारताला सांगितले पाहिजे की, हे विधान सरकारची नीती नाही. मोहम्मद नशीद भारताला समर्थन देणारे नेता म्हणून ओळखले जातात. २००८ मध्ये ते मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवडले गेले होते.

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून सुरू झाला वाद - 
पंतप्रधान मोदी नुकतेच लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की, त्यांनी लक्षद्वीपला भेट द्यावी. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर लक्षद्वीपची तुलना मालदीवबरोबर होऊ लागली. भारतातून मोठ्या संख्येने लोक मालदीवला फिरायला जातात. मोदींच्या दौऱ्यानंतर सोशल मीडिया यूजर्संनी मालदीव ऐवजी लोकांना लक्षद्वीपला फिरायला जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर मालदीव ट्रेंड करू लागले. याचा परिणाम मालदीववर झाला व त्यांच्या सरकारमधील मंत्री मालदीवच्या समर्थनार्थ पुढे आले. मात्र या खटाटोपात ते भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरू लागले.

भारत- मालदीव संबंधात कटूता -
मालदीव व भारताचे जुने संबंध आहे. मात्र मागील नोव्हेंबर महिन्यात मालदीवच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहम्मद मुइज्जु यांनी विजय मिळवण्यानंतर दोन्ही देशांमध्ये कटुता वाढू लागली आहे. मुइज्जु चीन समर्थक नेते आहेत व मुइज्जु यांनी राष्ट्रपती बनताच मालदीवमधून भारतीय लष्कर परत पाठवण्याची घोषणा केली.

पुढील बातम्या