मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Boycott maldives Hashtag : पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये; कारण काय?

Boycott maldives Hashtag : पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये; कारण काय?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 08, 2024 09:41 AM IST

PM Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपच्या भेट देत समुद्रात 'स्नॉर्कलिंग'चा आनंद घेतला. या बाबतचे फोटो देखील त्यांनी ट्विट केले आहे. यानंतर बॉयकॉट मालदिव हा ट्रेड वाढला आहे.

PM Modi Lakshadweep Visit
PM Modi Lakshadweep Visit

Behind Boycott Maldives Hashtag : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप येथे भेट दिली. समुद्रात 'स्नॉर्कलिंग'चा आनंद घेतला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहे. हे फोटो व्हायरल झाले असून ट्विटरवर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग सध्या चांगलाच ट्रेंड होत आहे. यामुळे मालदिवचे टेंशन वाढले आहे.

Ram Lalla Idol : दिव्य तेज, कोमलता, ५१ इंच उंच तर वजन १.५ टन! खास आहे रामलल्लाचं मनमोहक बालस्वरुप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपला भेट होती. ‘लँड ऑफ कोरल्स’ अशी लक्षद्वीपची ख्याती आहे. मोदी यांच्या भेटीनंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आला आहे. या बाबत मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, स्नॉर्कलिंग केल्यावर मोदी हे पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटो देखील त्यांनी शेअर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. लक्षद्वीपचे सौंदर्य पाहून अनेकजण आता तिथे जाण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, मालदीवच्या एका मंत्र्याच्या ट्विटरच्या पोस्टवरुन सोशल मीडियावर बॉयकॉट मालदिव हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.

aditya-l1 : शेतकऱ्याच्या मुलीच्या हाती आदित्य L1 मिशनची कमान; कोण आहे निगार शाजी?

लक्षद्वीपची वाढती चर्चा आणि लोकप्रियता मालदीवच्या एका खासदाराला चांगलीच खुपली. मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना एक भ्रम आहे. झाहिद रमीझ यांनी ट्विटरवर वादग्रस्त कमेंट केली की, "खोल्यांमधील कायमचा वास हा भारतासाठी सर्वात मोठी पडझड असेल". यानंतर लक्षद्वीपबाबत केलेल्या या वादग्रस्त टिप्पणीबद्दल एका भारतीय ट्विटर युजर्सने मालदीवच्या राजकारण्याला फटकारलं.

मालदिवचे नवे पंतप्रधान अब्दुल्ला महजूम मजीद यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. भारतीय सैन्याला देशाबाहेर त्यांनी काढले. त्यामुळे भरतीयांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. भारतीय नेटकऱ्यांनी आता बॉयकॉट मालदिव हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे.

Naresh Goyal : 'यापेक्षा मी तुरुंगातच मेलेलो बरा', जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल असे का म्हणाले ?

भारतीय नागरिकांच्या मते लक्षद्वीपमध्ये मालदीवपेक्षा सुंदर समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे आता आम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. 'अमितजी' नावाच्या एका माजी ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की मी नुकतीच मालदीवची फॅमिली ट्रिप रद्द केली आहे. कौटुंबिक कारणास्तव आम्ही ब्रिटनमधून भारतात येत आहोत आणि मालदीवला भेट देण्याचा विचार करत होतो. पण, आता मात्र, आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही मालदीवमधील बुक केलेले हॉटेल देखील रद्द केले आहे. याचा स्क्रीनशॉटही त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. डॉ. फलक जोशीपुरा नावाच्या महिला युजरने पोस्ट केले, 'माझा वाढदिवस २ फेब्रुवारीला आहे आणि मी तो मालदीवला जाऊन साजरा करण्याचा विचार करत होते. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून ट्रिपचा बेत जवळपास निश्चित केला होता. मात्र, मालदीवच्या मंत्र्यांचे ट्विट पाहून मी माझा प्लॅन रद्द केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल

PM मोदींनी अलीकडे लक्षद्वीपच्या भेटीदरम्यान समुद्राखालील जीवनाचा शोध घेण्यासाठी 'स्नॉर्कलिंग'चा आनंद घेतला. याचे फोटो व्हायरल होत आहे. अरबी समुद्रात वसलेल्या बेटांमधला त्यांचा उत्साहवर्धक असल्याचा अनुभव देखील मोदी यांनी शेअर केला. त्यांनी लिहिले, 'ज्यांना रोमांचकारी अनुभव हवा आहे, लक्षद्वीप त्यांच्या यादीत नक्कीच असावे. माझ्या वास्तव्यादरम्यान मी स्नॉर्कलिंगचाही प्रयत्न केला. किती आनंददायी अनुभव होता तो!' मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रकिना-यावरील मॉर्निंग वॉकचे फोटो आणि समुद्रकिनारी खुर्चीवर बसलेले काही विश्रांतीचे क्षणही शेअर केले. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

मालदीवची चीनशी जवळीक

पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या मंत्र्याचे हे वादग्रस्त वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला आपल्या देशातून सैन्य काढून घेण्यास सांगितले आहे. भारताने आपले सैन्य मागे न घेतल्यास मालदीवच्या लोकांच्या लोकशाही स्वातंत्र्याचा अपमान होईल, असे मुइझू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यामुळे मालदीवमधील लोकशाहीचे भवितव्य धोक्यात येईल. एवढेच नाही तर मुइझू ८ ते १२ जानेवारी दरम्यान चीनला भेट देणार आहे. भारतासोबतचे व्यापक द्विपक्षीय संबंध आणि मालदीवशी असलेली जवळीक लक्षात घेता मुइझ्झूची आधीचे नेते हे दिल्लीला भेट देत असत, त्यानंतर चीनला. पण अलीकडच्या काळात चीनने मालदीवमधील काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून मालदिववरील आपला प्रभाव वाढवला आहे.

WhatsApp channel

विभाग