मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arun Gandhi Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापुरात निधन

Arun Gandhi Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापुरात निधन

May 02, 2023, 02:15 PM IST

    • Mahatma Gandhi grandson Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला.
Arun Gandhi Passes Away

Mahatma Gandhi grandson Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला.

    • Mahatma Gandhi grandson Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला.

कोल्हापूर : महात्मा गांधी यांचे नातू तसेच लेखक अरुण गांधी यांचे कोल्हापुरात आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Sharad Pawar : अजित पवारांनी उचललेलं 'ते’ पाऊल चुकीचं; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांच्या आत्मचरित्रात मोठा खुलासा

अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात राहण्यास होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. १४ एप्रिल २९३४ ला त्यांचा डर्बनमध्ये जन्म झाला. त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांचा आदर्श त्यांनी घेत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे ते वडील होत.

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पाऊस; उकाड्यापासून मिळाला दिलासा, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

अरुण गांधी हे माजी केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. अरुण गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याचं काम केलं. ते पाच वर्षांचे असताना त्यांनी महात्मा गांधी यांना पहिले. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात १९४६ च्या दरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य देखील केले होते. महात्मा गांधी यांच्या लहानपणापासून त्यांच्यावर प्रभाव राहिल्याने त्यांनी देखील समाज कार्याचा वसा आयुष्यभर जपला.

अरुण गांधी यांनीही लिहिलेल्या पुस्तकांपैकी 'द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी' हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली. अरुण गांधी हे कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून वास्तव्यास होते.

विभाग

पुढील बातम्या