मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Khalistani : मोठी बातमी! ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, तिरंग्याचाही अपमान

Khalistani : मोठी बातमी! ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, तिरंग्याचाही अपमान

Mar 20, 2023, 09:43 AM IST

    • Khalistani supporters pull down Tricolour outside Indian High Commission in UK : लंडनमधून मोठी बातमी येत आहे. येथील भारताच्या उच्चायुक्तावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला आहे. उच्चायुक्तावरील तिरंग्याच्या अवमान करत खलिस्तानचे झेंडे या ठिकाणी झळकवण्यात आले. या नंतर हल्लेखोरांनी या ठिकाणी तोडफोड देखील केली.
Khalistani supporters pull down Tricolour outside Indian High Commission in UK

Khalistani supporters pull down Tricolour outside Indian High Commission in UK : लंडनमधून मोठी बातमी येत आहे. येथील भारताच्या उच्चायुक्तावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला आहे. उच्चायुक्तावरील तिरंग्याच्या अवमान करत खलिस्तानचे झेंडे या ठिकाणी झळकवण्यात आले. या नंतर हल्लेखोरांनी या ठिकाणी तोडफोड देखील केली.

    • Khalistani supporters pull down Tricolour outside Indian High Commission in UK : लंडनमधून मोठी बातमी येत आहे. येथील भारताच्या उच्चायुक्तावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला आहे. उच्चायुक्तावरील तिरंग्याच्या अवमान करत खलिस्तानचे झेंडे या ठिकाणी झळकवण्यात आले. या नंतर हल्लेखोरांनी या ठिकाणी तोडफोड देखील केली.

लंडन : लंडन येथून मोठी बातमी पुढे येत आहे. येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला आहे. या ठिकाणी त्यांनी तोडफोड करत भारतीय तिरंग्याचा अवमान करत खलिस्तानचे झेंडे फडवले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून भारताने या प्रकरणाचा निषेध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला अटक केली असून यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या वारिस दे पंजाब या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अमृतपालला ताब्यात घेतलं असून त्याच्या सहा सहकाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंग हा पंजाबमध्ये खलिस्तानच्या समर्थनासाठी चळवळ उभी करत होता. अमृत पाल सिंह याच्या अटकेमुळे खलिस्तान मागणी करणाऱ्या वारिस दे पंजाब या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अमृतपालला ताब्यात घेतलं असून त्याच्या सहा सहकाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंग हा पंजाबमध्ये खलिस्तानच्या समर्थनासाठी चळवळ उभी करत होता. अमृतपाल सिंह याच्या अटकेळमुळे खलिस्तानवाद्यांचे पित्त खवळले असून यामुळेच त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

भारताने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, लंडन येथे भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. या प्रकरणी ब्रिटेनच्या सर्वोच्च राजनैतिक अधिकाऱ्याला दिल्लीत पाचारण करण्यात आली असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस दिल्लीबाहेर आहेत. एलिस यांनी ट्विट करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय संकुल आणि तेथील लोकांविरुद्धच्या आजच्या घृणास्पद कृत्यांचा मी निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या घटनेनंतर भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधीही ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर अनेक हल्ले झाले आहेत. परंतु, प्रत्येक वेळी ब्रिटिश सरकारने डोळेझाक केली असून हल्लेखोरांवर कारवाई केलेली नाही.

या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन काढले असून लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाविरुद्ध खलीस्थानवाद्यांनी केलेल्या हल्ल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी ब्रिटनच्या वरिष्ठ राजनैतिकाला आज संध्याकाळी उशिरा बोलावण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्तालयापुढे पुरेसा बंदोबस्त नसल्याच्या कारणाचे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय संघटनेचे खलिस्तानवाद्यांना पाठबळ आहे. आयएसआयच्या इशाऱ्यावर खलिस्तानी दहशतवादी भारतीय उच्चायुक्तालयाला लक्ष्य करत आहेत. भारतविरोधी आंदोलनात पाकिस्तानी नागरिक देखील सहभागी असल्याचे पुढे आले आहे. ब्रिटनशिवाय कॅनडा आणि अमेरिकेतही अमृतपाल सिंग यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. अमृतपाल सिंगच्या अटकेवर कॅनडातील अनेक राजकारण्यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत.

विभाग

पुढील बातम्या