मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO NavIC : चीन, पाकिस्तानवर आता अंतराळातून राहणार नजर; इस्रोनं केलं 'नाविक' उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण

ISRO NavIC : चीन, पाकिस्तानवर आता अंतराळातून राहणार नजर; इस्रोनं केलं 'नाविक' उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण

May 29, 2023, 12:40 PM IST

    • ISRO NavIC : भारताने स्वदेशी जीपीस यंत्रणेतील अतिशय महत्वाच्या NVS-1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं. या उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानवर देखील नजर ठेवता येणार आहे.
Sriharikota, May 23 (ANI): GSLV-F12/NVS-01 mission is set for launch on May 29, 2023, at 10:42 hours IST from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR in Sriharikota. NVS-01 is first of the India's second-generation NavIC satellites that accompany enhanced features. (ANI Photo) (ISRO twitter)

ISRO NavIC : भारताने स्वदेशी जीपीस यंत्रणेतील अतिशय महत्वाच्या NVS-1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं. या उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानवर देखील नजर ठेवता येणार आहे.

    • ISRO NavIC : भारताने स्वदेशी जीपीस यंत्रणेतील अतिशय महत्वाच्या NVS-1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं. या उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानवर देखील नजर ठेवता येणार आहे.

ISRO ने सोमवारी देशाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला. स्वदेशी जीपीस यंत्रणेतील महत्वाचा आणि चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवणाऱ्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-1 चे यशस्वी प्रक्षेपण सोमवारी करण्यात आले. या उपग्रहामुळे देशाची देखरेख आणि नेव्हिगेशन क्षमता वाढणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Manipur violence : अमित शहा यांच्या दौऱ्याआधी मणीपुरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; पाच ठार, संचारबंदी कठोर

इस्रोची स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणा उभी करण्याची योजना आहे. या योजनेला NAVIC (GPS सारखी भारताची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली) असे म्हटल्या जाते. या उपग्रहामुळे भारत आणि आजू बाजूच्या तब्बल १ हजार ५०० किमी परिसराची रिअल-टाइम माहिती मिळवता येणार आहे.

इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, प्रक्षेपणाची उलटी गिनती रविवारी सकाळी ७.१२ वाजता सुरू करण्यात आली. ५१.७ मीटर उंच GSLV २ या प्रक्षेपकाद्वारे तब्बल २३२ किलो वजनाचा NVS-01 हा नेव्हिगेशन उपग्रह सोमवारी सकाळी १०.४२ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थळावरून अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आले.

Road Accident : गुवाहाटी येथे भीषण अपघात ७ इंजिनियर विद्यार्थी जागीच ठार; ६ जण जखमी

इस्रोने सांगितले की प्रक्षेपणानंतर सुमारे २० मिनिटांत रॉकेट सुमारे २५१ किमीच्या भू-स्थिर उंचीवर पोहोचले. हा उपग्रह पृथ्वीच्या ट्रान्स्फर ऑर्बिट (GTO) मध्ये प्रक्षेपित करण्यात आला आहे.

NVS 01 मध्ये LL आणि S बँड आहेट. हा उपग्रह दुसऱ्या पिढीतील उपग्रह आहे. यात उपग्रहामध्ये स्वदेशी विकसित रुबिडियम अणु घड्याळ देखील असून आज करण्यात आलेल्या प्रक्षेपणात स्वदेशी बनावटीचे रुबिडियम अणु घड्याळ वापरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

Pune fire : पुण्यात मार्केटयार्डमधील कागद-पुठ्ठा गोडाऊनला भीषण आग

NavIC ही इस्रोने विकसित केलेली स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे. यात सात उपग्रहांचा समावेश राहणार आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवरील अचूक माहिती मिळवता येणार आहे. यामुले नागरी विमान वाहतूक क्षेत्रात चांगली सेवा देण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सीमेच्या पलीकडे १ हजार ५०० 1500 किमी क्षेत्रावर लक्ष ठेवता येणार आहे.

 

१९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारताला जीपीएस यंत्रणेची गरज भासली होती. याबाबत अमेरिकेला मद देखील मागण्यात आली होती. मात्र, ही सेवा देण्यास अमेरिकेने नकार होता. यामुळे स्वदेशी जीपीएस यंत्रणेची गरज भारताला भासू लागली होती. अमेरिकेने नकार दिल्याने भारताने स्वतःची नेव्हिगेशन यंत्रणा तयार करण्यास सुरुवात केली. त्याला २००६ मध्ये मंजुरी मिळाली होती आणि २०११ पर्यंत ती तयार होईल असा विश्वास होता. मात्र, याला विलंब झाला.

 

हे उपग्रह जमीन, हवाई आणि जलवाहतुकीसाठी प्रभावीपणेवापरता येणार आहे. यासह, स्थान आधारित सेवांच्या दृष्टीने देखील नाविक यंत्रणा खूप महत्वाचे आहे. इस्रोचा विश्वास आहे की NVS-1 हा दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह मालिकेतील पहिला आहे. हे NAVIC चा वारसा कायम ठेवेल आणि LI बँडमध्ये नवीन सेवा सादर करेल.

विभाग

पुढील बातम्या