मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  American Airlines : उडत्या विमानात मद्यधुंद तरुणाचा किळसवाणा प्रकार; दिल्ली विमानतळावर आरोपीला अटक

American Airlines : उडत्या विमानात मद्यधुंद तरुणाचा किळसवाणा प्रकार; दिल्ली विमानतळावर आरोपीला अटक

Mar 05, 2023, 04:48 PM IST

    • American Airlines Crime News : न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघालेल्या विमानात भारतीय विद्यार्थ्यानं मद्यावस्थेत मूत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
American Airlines Crime News Marathi (HT)

American Airlines Crime News : न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघालेल्या विमानात भारतीय विद्यार्थ्यानं मद्यावस्थेत मूत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • American Airlines Crime News : न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघालेल्या विमानात भारतीय विद्यार्थ्यानं मद्यावस्थेत मूत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

American Airlines Crime News Marathi : शंकर मिश्रा नावाच्या आरोपीनं विमानातील एका महिलेवर मूत्रविसर्जन केल्याची घटना ताजी असतानाच आता न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघालेल्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानातही असाच काहीसा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतून भारतात परतत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यानं विमानाच्या सीटवरच लघुशंका केली, त्यानंतर तो सहप्रवाशाच्या अंगावर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाईन्स कंपनीचं विमान न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघालं होतं. त्यावेळी त्यात एक भारतीय विद्यार्थीही प्रवास करत होता. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळं आरोपी तरुणानं चक्क विमानाच्या सीटवरच मूत्रविसर्जन केलं. याशिवाय लघुशंका केल्यानंतर आरोपी प्रवासी सहप्रवाशाच्या अंगावर पडला. त्यानंतर आरोपीच्या शेजारी बसलेल्या प्रवाशानं घडलेला सारा प्रकार क्रू मेंबर्सकडे सांगितला. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला चांगलेच खडेबोल सुनावले. याशिवाय विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.

विमानातील क्रू मेंबर्सने या घटनेची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) दिली. पीडित प्रवाशानं तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यानं त्याची माफी मागितली आहे. त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुढील बातम्या