मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात लष्कराचे जवान बुलेटवरच का सादर करतात कसरती? 'हे' आहे कारण; वाचा

republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात लष्कराचे जवान बुलेटवरच का सादर करतात कसरती? 'हे' आहे कारण; वाचा

Jan 25, 2024, 01:59 PM IST

    • republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात  लष्कराचे जवान चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. तब्बल ६५ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९५९ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे १२ वर्षांनी, भारतीय लष्कराने देशाच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी ब्रिटनमधून रॉयल एनफिल्ड बुलेट आयात केल्या होत्या.
republic Day Parade 2024

republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात लष्कराचे जवान चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. तब्बल ६५ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९५९ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे १२ वर्षांनी, भारतीय लष्कराने देशाच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी ब्रिटनमधून रॉयल एनफिल्ड बुलेट आयात केल्या होत्या.

    • republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात  लष्कराचे जवान चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. तब्बल ६५ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९५९ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे १२ वर्षांनी, भारतीय लष्कराने देशाच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी ब्रिटनमधून रॉयल एनफिल्ड बुलेट आयात केल्या होत्या.

republic Day Parade 2024 : देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिवस हा २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात हा सोहळा जल्लोषात साजरा केला जातो. लष्कराचे संचलन हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असून उद्या देखील कर्तव्य पथावर हा दिमाखदार सोहळा होणार आहे. या संचलनात विविध प्रकारच्या चित्तथरारक कवायती सादर केल्या जातात. या वर्षी देखील बुलेट वरील कसरती भारतीय जवान सादर करणार आहेत. तब्बल ६५ वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Parth Pawar : अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी घेतली कुख्यात गुंड गजानन मारणेची भेट, चर्चेला उधाण

दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात लष्कर, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस कर्मचारी रॉयल एनफिल्ड मोटरसायकलवर कसरती सादर करणार आहेत. दरवर्षी या कसरतीचे सदरीकर रॉयल एनफिल्डच्या मोटारसायकलीवर केल्या जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच गाड्या या कसरतींसाठी का वापरल्या जात असतील? या बद्दलचची माहिती आपण घेणार आहोत.

तुम्हाला कळल्यावर आश्चर्य वाटेल की रॉयल एनफिल्ड बुलेट ही भारतीय लष्कराची अधिकृत दुचाकी वाहन आहे, १९५९ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे १२ वर्षांनी, भारतीय लष्कराने देशाच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी ब्रिटनमधून रॉयल एनफिल्ड बुलेट आयात केल्या होत्या. त्यावेळी त्याला एनफिल्ड बुलेट असे नाव होते. ही बुलेट तिच्या गिड-गिड आवाजासाठी प्रसिद्ध होती. आजही हा आवाज या मोटरसायकलचे आकर्षण आहे.

EVM News : ईव्हीएम हटाओ, गणतंत्र बचाओ… ९ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन

लष्कराने प्रयोग म्हणून एनफिल्ड बुलेटच्या पाच युनिट्सची ऑर्डर दिली होती. यानंतर त्यांनी आणखी काही गाड्या आयात केल्या. भारतीय रस्त्यांवर यशस्वी झाल्यावर आणि विक्री वाढवल्यानंतर, ब्रिटीश दुचाकी कंपनीने देशातच या दुचाकींचे उत्पादन करण्याची योजना आखली. ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या आयशरशी कंपनीशी भागीदारी करत तमिळनाडूत या गाड्या तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला. भारतात आल्यानंतर या गाडीचे नाव बदलून रॉयल एनफिल्ड करण्यात आले. आज जगभरात या गाडीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.

रॉयल एनफिल्डचे टॉप मॉडेल

Royal Enfield Bullet 350: या बाईकमध्ये ३४९ CC एअर-कूल्ड काउंटर सिंगल सिलेंडर जे सीरीज इंजिन आहे, जे २०.२ PS चा पॉवर आणि २७ Nm टॉर्क देते. हेच इंजिन Royal Enfield Classic 350, Hunter 350 आणि Meteor 350 मध्ये देखील बसवण्यात आले आहे. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकची इंधन टाकीची क्षमता १३ लीटर आहे. यात पुढील बाजूस ४१ मिमी टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आहे, तर मागील बाजूस ट्विन शॉक शोषक सस्पेंशन सेटअप आहे. ब्रेकिंग ड्युटीसाठी, यात ड्युअल-चॅनल एबीएससह ३०० मिमी फ्रंट आणि २७० मिमी रियर डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत. सिंगल चॅनेल एबिएस या ब्रेकिंग यंत्रनेसह रियर ड्रम ब्रेक त्याच्या बेस व्हेरियंटमध्ये दिलेले आहेत. रायडिंगसाठी, यात १९ इंच (पुढील) आणि १८ इंच (मागील) चाके आहेत, ज्यात १०० सेक्शन फ्रंट आणि १२० सेक्शनचा मागील टायर आहे.

क्लासिक 350 : या क्रूझर बाइकच्या मॉडेलमध्ये एलसीडी इनसेटसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. याशिवाय, यात क्लासिक ३५० आणि मेटियर ३५० सारखे रोटरी स्विचगियर देखील देण्यात आहेत. यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल फ्युएल गेज, ट्यूबलेस टायर, हॅलोजन हेडलाईट, एलईडी टेललाइट, बल्ब टर्न सिग्नल लॅम्प या सारख्या सुविधा देखील यात देण्यात आल्या आहेत. या गाडीची एक्स-शोरूम किंमत १.९० लाख रुपयांपासून सुरू होते, जी २.२१ लाख रुपयांपर्यंत जाते.

FACT CHECK: शाहरुख खानने अयोध्येत जाऊन घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन? काय Viral Video मागिल सत्य

Royal Enfield Classic 350: ही मोटरसायकल सिंगल चॅनल ABS आणि ड्युअल चॅनल ABS या दोन प्रकारांमध्ये येते. या क्रूझर बाइकमध्ये ३५० सीसी सिंगल सिलेंडर ४ स्ट्रोक एअर-कूल्ड इंजिन आहे, जिची ऊर्जा निर्माण करण्याची शक्ति ही २०.२ PS आणि २७ Nm आहे. यात ५ स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे. त्याचे वजन १९५ किलो आहे. या बाईकची इंधन टाकीची क्षमता १३ लीटर आहे. तर मायलेज ३६.२ kmpl आहे.

Royal Enfield Himalayan 450: या बाईकमध्ये ४५० सिसीचे लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर 'शेप्रा' इंजिन देण्यात आहे. हे इंजिन तब्बल ८ हजार आरपीएमवर ४०.२ PS पॉवर आणि ५५०० आरपीएमवर ४० एनएम टॉर्क ऊर्जेची निर्मिती करते. इंजिनसोबतच यात ६ स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप आणि असिस्ट क्लच देखील देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन १९६ किलो आहे, तर इंधन टाकीची क्षमता १७ लीटर एवढी आहे. या गाडीची किंमत २.८५ लाख रुपयांपासून सुरू होते.

Royal Enfield Meteor 650: ही बाईक Astral, Interstellar आणि Celestial या तीन प्रकारांमध्ये येते. स्टील ट्युब्युलर स्पाइन फ्रेमवर बांधलेल्या या बाईकमध्ये ६४८ सिसी पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे ४७ PS पॉवर आणि ५२.३ Nm टॉर्क ऊर्जा टायर करते यात इंजिनसह ६ स्पीड गिअरबॉक्स आहे. यात वेट मल्टिपल क्लच आहे. या बाईकचे कर्ब वेट ३४१ किलो (९० टक्के इंधन आणि तेलासह) आहे. त्याची इंधन टाकी क्षमता १५.७ लीटर आहे. या गाडीचा मायलेज २५ किमी प्रति लिटर आहे. या गाडीची किंमत ३.४९ लाख रुपयांपासून सुरू होते.

विभाग

पुढील बातम्या