रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये पार पडला. या सोहळ्याला काही मोजक्याच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापाठोपाठ बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो संपूर्ण सुरक्षतेमध्ये मुलगी सुहानासोबत मंदिराबाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ अयोध्येमधील राम मंदिरातील असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. पण काय आहे त्या व्हिडीओमागिल सत्य चला जाणून घेऊया...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कुर्ता आणि धोतर घालून एका मंदिरातून बाहेर येताना दिसत आहे. त्यापाठोपाठ शाहरुखची मुलगी सुहाना ही पांढरा ड्रेस घालून दिसत आहे. तसेच त्याची मॅनेज पूजा देखील दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत 'जय श्रीराम' असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'शाहरुख खान पोहोचला अयोध्येत' असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर ही चुकीची माहिती पसरवली जात आहे.
वाचा: विषारी किड्याने स्पर्श करताच अभिनेत्याला आला हार्ट अटॅक
शाहरुख खान हा सप्टेंबर २०२३मध्ये आंध्रप्रदेशमधील तिरुपती मंदिरात गेला होता. त्यावेळचा त्याचता व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना हा अयोध्येतील व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. मात्र हे सत्य नाही. हा व्हिडीओ जुना आहे. पाहा शाहरुखचा खरा व्हिडीओ...
बॉलिवूडमधील काही मोजक्याच लोकांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, कंगना रणौत, आयुषमान खुराना, अनुपम खेर, रजनीकांत, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांचा समावेश होता. तसेच शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि इतर कलाकारांना आमंत्रण देण्यात आले नव्हते.