मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India-China Standoff : तवांगच्या उंच पर्वत रांगा हडपण्याचा चीनी सैनिकांचा डाव भारतीय सैनिकांनी उधळला

India-China Standoff : तवांगच्या उंच पर्वत रांगा हडपण्याचा चीनी सैनिकांचा डाव भारतीय सैनिकांनी उधळला

Dec 14, 2022, 08:03 AM IST

    • India-China Standoff : तवांग येथे चीनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत नवे खुलासे पुढे येत आहेत. चीनी सैनिकांचा येथील उचं पर्वतांवर ताबा मिळवण्याचा डाव होता अशी माहिती मिळत आहे.
India-China Standoff

India-China Standoff : तवांग येथे चीनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत नवे खुलासे पुढे येत आहेत. चीनी सैनिकांचा येथील उचं पर्वतांवर ताबा मिळवण्याचा डाव होता अशी माहिती मिळत आहे.

    • India-China Standoff : तवांग येथे चीनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत नवे खुलासे पुढे येत आहेत. चीनी सैनिकांचा येथील उचं पर्वतांवर ताबा मिळवण्याचा डाव होता अशी माहिती मिळत आहे.

दिल्ली : तवांगच्या यांगस्ते परिसरात चीनी सैनिकांनी ९ डिसेंबर रोजी केलेल्या घुसखोरीसंदर्भात रोज नवी माहिती पुढे येत आहे. लष्कराशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, चीनी सैनिक येथील उंच पर्वत रंगणवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, संतर्क असलेल्या भारती सैनिकांनी चीनी सैनिकांचा डाव उधळला. त्यांना लाकडी आणि लोखंडी दांडक्यांनी चोप देऊन त्यांना परत पाठवले.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

९ डिसेंबर रोजी तवांग येथील एका परिसरात भारत आणि-चीन यांच्यात झडप झाली. ज्या ठिकाणी ही झडप झाली ते क्षेत्र तवंग पासून ३८ किमी अंतरावर आहे. या क्षेत्रात उंच पर्वत रांगा आहेत. यातील एक डोंगर हा तब्बल १७ हजार फुटांपेक्षा देखील उंच आहे. सामरिक दृष्ट्या हा डोंगर अतिशय महत्वाचा आहे. या डोंगराचा मोठा भाग हा भारतीय हद्दीत येतो. भारतीय सेना या परीसारात बळकट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पर्वतावर चीनी सैनिकांना ताबा मिळवायचा होता. त्यामुळे ते मोठ्या संखेने आले. या पूर्वीही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनी सैनिकांनी याच प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

चीनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीचा हा प्रयत्न पूर्वनियोजित होता. त्यांनी २०२० मध्ये देखील असाच घुसखोरीचा प्रयत्न केलेला. लडाख परिसरात चीनी सनिकांनी फींगर ४ पासून ते फींगर ८ पर्यन्तच्या डोंगरांवर घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय लष्कर तातडीने सक्रिय झाल्यावर चीनी सैनिकांनी माघार घेतली होती. लडाख येथील घटनेनंतर या परिसरात लष्कर सतर्क असून चीनी सैनिकांवर बारीक लक्ष ठेवून आहे. मिळणाऱ्या प्रतेक माहितीवर भारतीय सैनिक तातडीने कारवाई करत आहे.

विभाग

पुढील बातम्या