मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India China Face Off : अरुणाचलमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट, अनेक सैनिक जखमी

India China Face Off : अरुणाचलमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट, अनेक सैनिक जखमी

Dec 12, 2022, 09:14 PM IST

  • India china face off : भारत आणि चीनी सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजुचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. जखमी भारतीय सैनिकांवर गुवाहाटीत उपचार सुरू आहेत.  

अरुणाचलमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट

India china face off : भारत आणि चीनी सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजुचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. जखमी भारतीय सैनिकांवर गुवाहाटीत उपचार सुरू आहेत.

  • India china face off : भारत आणि चीनी सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजुचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. जखमी भारतीय सैनिकांवर गुवाहाटीत उपचार सुरू आहेत.  

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदाझटापट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये LAC वर झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी चिनी सैन्य LAC जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तेथे तैनात भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना माघारी धाडले. या चकमकीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तेथून माघार घेतल्याचे वृत्त आहे. चकमकीत जखमी झालेल्या सर्व भारतीय जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिक आमने-सामने आल्यानंतर भारताच्या एरिया कमांडरने आपल्या चिनी समकक्षासोबत फ्लॅग मीटिंग घेतली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी हे प्रकरण संयुक्तपणे सोडवण्याचे मान्य केले. त्याच वेळी,दोन्ही बाजूंकडून शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

विशेष म्हणजेगलवाननंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये झटापट झाली. यापूर्वी गलवान खोऱ्यातही भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनने आपापल्यावर्चस्वाचे क्षेत्र कायम राखले आहे. मात्र, चीनकडूनया क्षेत्रात नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ड्रॅगन २००६ पासून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

 

विभाग

पुढील बातम्या